IMPIMP

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी महत्वाची बातमी ! पीएम किसानच्या 10 व्या हप्त्यासाठी ‘हे’ कार्ड आवश्यक, अन्यथा अकाऊंटमध्ये येणार नाहीत पैसे

by nagesh
PM Kisan | changes in the rules regarding the status of pm kisan scheme now mobile number will not be needed

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Kisan | तुम्ही सुद्धा प्रधानमंत्री किसान (PM Kisan) सम्मान निधी योजनेचे (PM Kisan Samman Nidhi) लाभार्थी असाल तर ही तुमच्यासाठी अतिशय कामाची बातमी आहे. मोदी सरकारने (Modi Government) रजिस्ट्रेशनच्या प्रक्रियेत काही बदल केले आहेत. या अंतर्गत आता पीएम किसान योजनेत रजिस्ट्रेशनसाठी रेशनकार्ड अनिवार्य केले आहे. म्हणजे तुम्ही रेशनकार्डशिवाय या योजनेत रजिस्ट्रेशन करू शकत नाही. तर, रेशन कार्डच्या अनिवार्यतेसह आता नोंदणीदरम्यान कागादपत्रांची केवळ सॉफ्टकॉपी (PDF) बनवून पोर्टलवर अपलोड करावी लागेल.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

जाणून घ्या कशी जमा करावी कागदपत्रे

 

आता सातबारा, आधारकार्ड, बँक पासबुक आणि प्रतिज्ञापत्रांची हार्डटकॉपी जमा करण्याची अनिवार्यता बंद केली आहे.
आता या कागदपत्रांची पीडीएफ फाईल बनवून पोर्टलवर अपलोड करावी लागेल.
यामुळे शेतकर्‍यांच्या वेळेची बचत होईल सोबतच नवीन व्यवस्थेत योजना पारदर्शी बनवण्याचा प्रयत्न केला आहे.

 

या दिवशी येतील खात्यात पैसे

 

सरकारने पीएम किसान योजनेंतर्गत 10 वा हप्ता जारी करण्याची तारीख ठरवली आहे.
केंद्र सरकार 15 डिसेंबर 2021 पर्यंत 10वा हप्ता जारी करण्याचा प्रयत्न करत आहे.
सरकारने मागील वर्षी 25 डिसेंबर 2020 ला शेतकर्‍यांना पैसे ट्रान्सफर केले होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

असे करा रजिस्ट्रेशन

 

  • अँड्रॉईड फोन वापरत असाल तर Google Play Store मध्ये जाऊन PM Kisan GoI Mobile App डाऊनलोड करा.
  • सर्वप्रथम न्यू रजिस्ट्रेशनच्या लिंकवर क्लिक करा.
  • यानंतर आधार नंबर नोंदवा आणि आपल्या राज्याचे नाव निवडा.
  • यानंतर इमेज कोड (कॅप्चा कोड) टाका.
  • माहिती भरण्यासाठी नाव, पत्ता, बँक अकाऊंट डिटेल, IFSC कोड एंटर करा.
  • यानंतर जमिनीची माहिती, जसे की, सर्व्हे नंबर इत्यादी भरा. सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा आणि तुमचे मोबाइल रजिस्ट्रेशन पूर्ण झाले.
  • याशिवाय शेतकरी कोणत्याही चौकशीसाठी पीएम किसान हेल्पलाइन नंबर 155261/011-24300606 चा वापर करूशकतात.

 

Web Title : PM Kisan | pm kisan beneficiary 10th installment will note come in account do this work immediately

 

हे देखील वाचा :

Climate Change | जलवायू परिवर्तनामुळे भारतातील ‘या’ शहरांना धोका ! पुढील 9 वर्षात पाण्याखाली बुडण्याची शक्यता, महाराष्ट्रातील 2 शहरांचाही समावेश

Multibagger Stock | 4 रु.चा शेयर 75 रुपयांचा झाला, एका वर्षात 1 लाखाचे झाले 18 लाख, तुमच्याकडे आहे का?

Pune Crime | पुण्यातील महिलेला ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम पडला साडेचार लाखाला, जाणून घ्या प्रकरण

 

Related Posts