IMPIMP

Pune Crime | पूर्व वैमनस्यातून तरुणाच्या डोक्यात दगड घालून खूनाचा प्रयत्न; लोणी काळभोरमधील घटना

by nagesh
Pune Crime News | Pune-Warje Malwadi Crime News : Warje Police Station - Gangsters attempt to kill by stabbing them with swords due to prior enmity

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पूर्ववैमनस्यातून सराईत गुंडाने तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड व दगडाने मारुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केला. या घटनेत अब्दुल हमीद शमशुद्दीन शेख हे जबर जखमी झाले आहेत. (Pune Crime)

 

याप्रकरणी उत्फत अब्दुल हमीद शेख (वय ३२, रा. घोरपडे वस्ती, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ४६६/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सागर पाटोळे आणि सागर गुडेकर (दोघे रा. इंदिरानगर, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर – Lonikalbhor) यांना अटक केली आहे. सागर गुडेकर हा सराईत गुंड आहे. ही घटना लोणी काळभोरमधील इंदिरानगर चौकात मंगळवारी सायंकाळी ७ वाजता घडली. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती अब्दुल शेख यांची आरोपीबरोबर भांडणे झाली होती. अब्दुल शेख हे इंदिरानगर चौकात असताना सागर गुडेकर व त्याच्या साथीदाराने लोखंडी रॉड व दगडाने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक तरटे तपास करीत आहेत.

 

 

Web Title :-  Pune Crime | Attempt To Murder Incident in Lonikalbhor police station limits

 

हे देखील वाचा :

Pune Ganeshotsav 2022 | पुन्हा एकदा निनादले ‘ॐ नमस्ते गणपतये…’ चे सूर

Rule Change | आजपासून झाले ‘हे’ 5 मोठे बदल, जाणून घ्या तुमच्या खिशावर कसा वाढला भार

Gold Prices Today | सोने दोन महिन्यात सर्वात स्वस्त, चांदीत सुद्धा मोठी घसरण, जाणून घ्या 10 ग्रॅमचा नवीन दर

LPG Gas Price | दिलासादायक! LPG गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात, घरगुती ग्राहकांसाठी दर काय?, जाणून घ्या…

 

Related Posts