IMPIMP

Pune Crime | डोक्यात फोडली बिअरची बाटली; चौघांविरोधात FIR

by nagesh
Pune Crime | bottle liquor smashed head stopped drinking alcohol

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | ‘इथे दारू पिऊ नका’ असं एका महिलेने सांगितल्याने महिलेबरोबर असलेल्या तरुणाच्या (Pune Crime) डोक्यात चौघा दारुड्यांनी बिअरची बाटली फोडली आहे. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील महालेनगर परिसरात घडला. बिअरची बाटली फोडल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police Station) चौघांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

याबाबत माहिती अशी, याप्रकरणी सिद्धार्थ लक्ष्मण कट्टीमणी (Siddharth Laxman Kattimani) (वय 29, रा. सीता सदन, गोखलेनगर रोड) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली. यावरुन सौरभ संजय डोंगरे (Saurabh Sanjay Dongre), अमित देवकर (Amit Deokar), रोहित देवकर (Rohit Deokar) आणि पवार (Pawar) (हे सर्व रा. महालेनगर, वडारवाडी) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, फिर्यादी व त्यांची मावशी हे महालेनगर येथे त्यांच्या भाडेकरूकडे भाडे मागण्यासाठी रविवारी रात्री 8.30 च्या दरम्यान गेले होते. तेथे मोकळ्या जागेत फिर्यादीच्या ओळखीचे चौघेजण दारू पीत बसले होते. (Pune Crime)

दरम्यान, त्यावेळी फिर्यादीच्या मावशीने त्या चौघांना इथे दारू पिऊ नका. भाडेकरू कसे येणार जाणार असे म्हणाल्या. यावरून त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या मावशीला शिवीगाळ केली. रोहित देवकर याने फिर्यादीच्या डोक्यात बिअरची बाटली मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक उकिर्डे (API Ukirde) करीत आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

Web Title :- Pune Crime | bottle liquor smashed head stopped drinking alcohol

 

हे देखील वाचा :

EPFO Update | केवळ एका चुकीमुळे बंद होईल पीएफ खाते, नंतर ‘हे’ काम केल्याशिवाय होणार नाही अ‍ॅक्टिव्ह; जाणून घ्या

Malaika Arora | मलाईका अरोराच्या बोल्ड फोटोमुळं चाहत्यांनी केलं ट्रोल, नेटकरी म्हणाले – ‘वाह काय टैलेंट आहे, शेंडीला पण नाचवलं…’

Pune Crime | पुणे स्टेशन परिसरातून 15 लाख 67 हजारांचे अमली पदार्थ जप्त; दोघांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई

 

Related Posts