IMPIMP

EPFO Update | केवळ एका चुकीमुळे बंद होईल पीएफ खाते, नंतर ‘हे’ काम केल्याशिवाय होणार नाही अ‍ॅक्टिव्ह; जाणून घ्या

by nagesh
EPFO Pension Rule | pension rule big change now you will get pension on this date check details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था EPFO Update | नोकरदार लोकांसाठी ईपीएफ खाते (PF Account) ही मोठी गोष्ट असते. यामध्ये कर्मचार्‍यांच्या पगाराचा काही भाग जमा केला जातो, त्यावर सरकारकडून व्याज दिले जाते. आणि हे पैसे गरजेच्या वेळी काढता येतात किंवा निवृत्तीनंतर हे पैसे नोकरदार लोकांसाठी उपयोगी पडतात. परंतु अनेक वेळा असे घडते की काही चुका नकळतपणे किंवा माहितीच्या अभावामुळे होतात. त्यामुळे पीएफ खाते बंद होऊ शकते. पीएफ खाते का बंद होते, ते कसे अ‍ॅक्टिव्ह ठेवावे ते जाणून घेवूयात. (EPFO Update)

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

 

या कारणामुळे बंद होऊ शकते पीएफ खाते

सध्याच्या कंपनी सोडून तुम्ही दुसरी कंपनी जॉईन केली असेल किंवा नोकरी सोडली असेल, आणि खात्यात पैसे ट्रान्सफर झाले नाहीत आणि जुनी कंपनीही बंद झाली असेल. अशा परिस्थितीत, जर तुमच्या पीएफ खात्यातून 36 महिन्यापर्यंत कोणताही व्यवहार झाला नाही, म्हणजे त्यात पैसे टाकले गेले नाहीत, तर तुमचे पीएफ खाते बंद केले जाईल. EPFO अशा खात्यांना Inoperative श्रेणीत ठेवते.

 

असे करू शकता अ‍ॅक्टिव्ह

एकदा तुमचे खाते inoperative झाले की तुम्ही व्यवहार करू शकणार नाही. ते सक्रिय करण्यासाठी ईपीएफओमध्ये जाऊन अर्ज द्यावा लागेल. इनऑपरेटिव्ह झाल्यानंतरही खात्यातील पैशांवर व्याज जमा होत राहते. 2016 मध्ये नियमात सुधारणा करून असे व्याज भरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आता पीएफ खात्यावर व्याज दिले जात आहे. हे व्याज वयाच्या 58 वर्षापर्यंत दिले जाते. (EPFO Update)

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

या कारणांमुळे खाते होते इनऑपरेटिव्ह

– सेवानिवृत्तीच्या 36 महिन्यांनंतर जेव्हा सदस्य 55 वर्षांचा होतो.

– जेव्हा सभासद कायमस्वरूपी परदेशात स्थायिक होतो.

– सदस्याचा मृत्यू झाला असेल तरी, पीएफ खाते बंद होऊ शकते.

– सदस्याने सर्व निवृत्ती निधी काढला असेल तरीही ईपीएफ खाते बंद होते.

– जर 7 वर्षापर्यंत कोणीही PF खात्यावर क्लेम केला नाही, तर हा निधी Senior Citizens’ Welfare Fund मध्ये टाकला जातो.

 

कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल

आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, रेशन कार्ड, ESI ID, ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, KYC कागदपत्र म्हणून घेतले जातात. यानंतर, तुमच्या खात्यातील पैशांवर सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त किंवा इतर कोणत्याही अधिकार्‍याकडून क्लेम केला जाऊ शकतो.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

Web Title :- EPFO Update | epfo update pf account will be closed due to just one mistake then it will not be active without this working

 

हे देखील वाचा :

Malaika Arora | मलाईका अरोराच्या बोल्ड फोटोमुळं चाहत्यांनी केलं ट्रोल, नेटकरी म्हणाले – ‘वाह काय टैलेंट आहे, शेंडीला पण नाचवलं…’

Pune Crime | पुणे स्टेशन परिसरातून 15 लाख 67 हजारांचे अमली पदार्थ जप्त; दोघांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई

JanDhan Account | जनधन खातेधारकांसाठी खुशखबर ! आता बॅलन्स नसताना घेऊ शकता 10 हजार रुपयांचा फायदा, जाणून घ्या

 

Related Posts