IMPIMP

Pune Crime Branch Police | अग्नीशस्त्र बाळगणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक, 1 पिस्तुलासह काडतुस जप्त

by nagesh
pune-crime-srpf-exam-in-pune-attempt-to-copy-by-blue-tooth-arrested-by-hadapsar-police

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime Branch Police | बेकायदेशीररित्या अग्नीशस्त्र बाळगणार्‍याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक – 2 ने (anti extortion cell) अटक केली आहे. त्याच्याकडून 1 पिस्तुल आणि 1 काडतुस असा एकुण 40 हजार रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. वानवडी (Wanwadi) परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात (Pune Crime Branch Police) आले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

मलेश सारंग वेलायधन (25, रा. घोरपडी वस्ती, श्रीवस्तीनगर, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथक – 2 मधील पोलिस हवालदार शैलेश सुर्वे आणि सचिन अहिवळे यांना आरोपी हा वानवडी रोडवरील एका अमृततुल्य चहा सेंटरच्या समोर फिरत असून त्याच्या कमरेला पिस्तुल असल्याची माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली.

 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta), सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (Jt CP Dr. Ravindra Shisve), अप्पर आयुक्त अशोक मोराळे (Addl CP Ashok Morale), उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Crime Shrinivas Ghadge), सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Barate) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare), उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, अंमलदार संपत अवचरे, शैलेश सुर्वे, प्रदिप शितोळे, सुरेंद्र जगदाळे, साळुंके, उत्तरकर, सचिन अहिवळे, विजय गुरव, अमोल पिलाने, प्रविण पडवळ आणि चेतन शिरोळकर यांच्या पथकाने सापळा रचुन आरोपी मलेश वैलायधन याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 1 पिस्तुल आणि काडतुस आढळून आले. पोलिसांनी त्याच्याविरूध्द वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

 

Web Title : Pune Crime Branch Police | Crime Branch arrests firearm holder, seizes 1 pistol and cartridges

 

हे देखील वाचा :

ISRO Recruitment 2021 | तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी ! इस्रो LPSC मध्ये ‘या’ पदासाठी लवकरच होणार भरती, 63200 सॅलरी

ED चे वरिष्ठ अधिकारी देखील लवकरच भाजपचं ‘कमळ’ हाती घेणार?

Pune Mucormycosis | दिलासा ! पुण्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांत लक्षणीय घट; 2 महिन्यांत एकही मृत्यू नाही

 

Related Posts