IMPIMP

Pune Crime | बनावट दागिने दाखवून कारागिराने केली दीड कोटी रुपयांची फसवणूक; रविवार पेठेतील घटना

by nagesh
 Pune Pimpri Crime | Had to buy car on OLX expensive, young man cheated of Rs 4.5 lakh; The incident took place in Sangvi premises

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | सोन्याचे दागिने बनविण्यासाठी जवळपास ३ किलो सोने दिले असताना त्यापासून दागिने बनविले असे दाखविण्यासाठी बनावट दागिने दाखवून दागिन्यांची परस्पर विक्री करुन एका कारागीराने तब्बल १ कोटी ४३ लाख १२ हजार ७८ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी (Faraskhana Police Station) मेहबुब शेख (रा. रविवार पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत जमार इब्राहिम शेख (वय ४१, रा. कसबा पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१८ पासून सुरु होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमार शेख यांचा गणेश पेठेत कारखाना आहे.
आरोपीचे फिर्यादींचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडे सोन्याचे काम करण्यासाठी २९५४ ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने घेतले.
फिर्यादी यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याचे हस्ताक्षरात एका डायरीमध्ये याची नोंद केली.

 

फिर्यादी यांच्याकडून घेतलेल्या सोन्याचे बदली़ त्यांना बनावट सोने दाखवून ते खरे असल्याचे भासविले.
बनावट दागिने तयार करुन ते दाखवून सध्या दागिन्यांना मागणी नाही. कोरोनामुळे दुकाने बंद आहेत.
ग्राहक नाही, असे वेगवेगळी कारणे सांगितली. प्रत्यक्षात त्याने त्या सोन्याचे दागिने बनवून त्यांची परस्पर विक्री केली.
त्यांना त्याच्या सोन्याचे पैसे देऊन तो नफा (Pune Crime) असल्याचे भासविले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

फिर्यादी यांनी अनेक दिवस वाट पाहिल्यानंतरही त्याने पैसे न दिल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
त्यानंतर त्यांनी आता फिर्याद (Pune Crime) दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक शेटे तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Craftsman cheats Rs 1.5 crore by showing fake jewelery; Sunday Pethe incident

 

हे देखील वाचा :

Amravati Violence | त्रिपुरा हिंसाचाराचे पडसाद अमरावतीमध्ये, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Pune Crime | मुलांच्या क्रिकेट खेळण्याच्या वादातून वडिलांना जीवे मारण्याचा प्रयत्न; वानवडी परिसरातील घटना

Pune Crime | कंपनीत सोबत काम करणार्‍या तरूणीवर जडला जीव, जेवणासाठी घरी बोलावून केली भानगड अन्…

 

Related Posts