IMPIMP

Pune Crime | पुण्यात स्नॅक सेंटरसाठी खर्च केलेले 2 लाख रुपये मागणार्‍यावर खंडणीचा गुन्हा

by nagesh
Pune Crime | Raj Ravindra Pawar, a notorious criminal from Loni Kalbhor area of Pune, was deported for two years

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  – Pune Crime | स्नॅक सेंटर चालविण्यावरुन झालेल्या वादानंतर महिलेने स्नॅक सेंटर सोडून दिले. मात्र, तिच्या मुलाने या सेंटरसाठी खर्च केलेले २ लाख रुपये घेण्यासाठी जागा मालकाला फ्लॅट पाहिजे असल्याचे भासवून महिलेच्या नावाने फोन करुन बोलावून घेऊन धमकी दिल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

याप्रकरणी निखील प्रकाश भगत (वय ४०, रा. सनश्री सोसायटी, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली
आहे. त्यावरुन पोलिसांनी करण वाझ (वय २० व इतर तिघांविरुद्ध खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगत यांचे मिसाळ दरबार नावाचे हॉटेल आहे.
या हॉटेलमध्ये त्यांनी जेवण व स्नॅक असे दोन भाग केले होते. स्नॅक सेंटर चालविण्यासाठी त्यांनी मिली डी वाझ यांच्याबरोबर ११ महिन्यांचा करार केला होता.
मात्र, तीन महिन्यात त्यांच्यात वाद झाला. तेव्हा मिली वाझ यांनी स्नॅक सेंटर खाली करुन निघून गेल्या.
त्यावेळी त्यांचा मुलगा करण वाझ याने फिर्यादी यांना स्नॅक सेंटरला खर्च केलेले २ लाख रुपये मागण्यास सुरुवात केली.
फिर्यादी यांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिला.
आरोपीने फिर्यादीस आरती नावे महिलेच्या फोनवरुन फोन करुन या महिलेस फ्लॅट पाहिजे
असल्याचे भासवून फिर्यादीस रहेजा व्हिस्टा चौकात ४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेसात वाजता बोलावले.
फिर्यादी तेथे गेल्यावर त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन २ लाख रुपयांची खंडणी मागितली.
फिर्यादीने आता तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा (Pune Crime) दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक बर्गे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Crime of ransom against a person who demanded Rs 2 lakh spent for a snack center in Pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime | CCTV मध्ये कैद होवून दंड बसू नये म्हणून लढवलेली शक्कल आली अंगलट; प्रसाद कटारियाविरूध्द FIR दाखल

Multibagger Stock | 34 रुपयांचा शेयर झाला 130 रुपयांचा, एक वर्षात दिला 250 टक्केपेक्षा जास्त रिटर्न, तुमच्याकडे आहे का हा Stock?

RRC Railway Recruitment-2021 | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! रेल्वेत 1600 हून अधिक पदांसाठी बंपर भरती, जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts