IMPIMP

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! सासरच्या जाचाला कंटाळून संरक्षण दलातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

by nagesh
Pune Crime News | Warje Malwadi Police Station - Ex-BJP office-bearer commits suicide by hanging himself

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | सासरच्या जाचाला कंटाळून संरक्षण दलातील कर्मचाऱ्याने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना (Pune Crime) समोर आली आहे. ही घटना परंडवाल चौक, देहूगाव (Dehugaon) येथे 26 जानेवारीला सकाळी 11.30 च्या सुमारास उघडकीस आली आहे. पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून ही आत्महत्या केली आहे. याप्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. प्रकाश बाबुराव हरकळ (Prakash Baburao Harkal) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत माहिती अशी की, फिर्यादी यांचा भाऊ मृत प्रकाश हरकळ हे संरक्षण दलात नोकरीस होते. प्रकाश आणि सिंधू यांचा विवाह झाला. विवाहानंतर पत्नी सिंधू आणि तिच्या माहेरच्या लोकांनी प्रकाश यांना सतत अपमानास्पद वागणूक दिली. आणि फारकतीसाठी दहा लाख रुपये देण्याची मागणी केली. खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकीही आरोपींनी दिली आहे. या त्रासाला कंटाळून प्रकाश यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. (Pune Crime)

दरम्यान, या प्रकरणी प्रकाश यांची बहीण बेबीसरोज विलास डोके (Babyserose Vilas Doke) (वय 30, रा. परभणी) यांनी मंगळवारी (1 फेब्रुवारी) रोजी देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehuroad Police Station) फिर्याद दिली. त्यानुसार प्रकाश यांची पत्नी सिंधू प्रकाश हरकळ (Sindhu Prakash Harkal), सासरे किसन नामदेव शिंदे (Kisan Namdev Shinde), सासू राधाबाई शिंदे (Radhabai Shinde), मेहुणा संदीप शिंदे (Sandeep Shinde), दामोदर शिंदे (Damodar Shinde) (सर्व रा. खालापूर, मूळ रा. नाशिक) यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संजय डमाळ (PSI Sanjay Damal) तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | defence employee commits suicide due harassment dehugaon pune pimpri chinchwad crime news

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Bureau (ACB) Dhule | 50 हजार रुपये लाच देण्याचा प्रयत्न ! लाच देऊन PhD मागणाऱ्या शिक्षकाला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

Shamita Shetty Worth | अभिनेत्री शमिता शेट्टीकडे कोट्यवधींची संपत्ती; पण सिनेविश्वात फ्लॉप

Pune Crime | चरस अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

Salman Khan | सलमान खान लवकरच अडकणार विवाह बंधनात?

 

Related Posts