IMPIMP

Pune Crime | जीवधन किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेल्या उच्चशिक्षीत तरुणीचा पाय घसरून मृत्यू

by nagesh
pune crime delhi woman 30 dies after falling into gorge at jivdhan fort

पुणे / जुन्नर (Pune) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)–  Pune Crime | कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटनस्थळावर (Tourist destination) नागरिकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, काही पर्यटक नियमांचे उल्लंघन करुन पर्यटनस्थळी जात आहेत. भर पावसात पर्यटनासाठी भटकंती करत असताना मित्रांसोबत किल्ल्यावर गेलेली तरुणी खाली उतरत असताना तिचा पाय घसरला. त्यामुळे ती खोल दरीत (deep valley) कोसळल्याने (falling) तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पुणे (Pune Crime) जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील (Junnar taluka) नाणेघाट (Naneghat) जवळील जीवधन किल्ल्यावर (Jivdhan Fort) घडली. ही तरुणी मुळची नवी दिल्ली येथील असून ही घटना बुधवारी (दि. 4) घडली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव (Police Inspector Vikas Jadhav) यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुचिका सेठ Ruchika Seth (वय-30 रा. नवी दिल्ली) असे या तरुणीचे नाव आहे. रुचिका 31 जुलैला दिल्लहून ठाणे येथे आली होती. तिथून मित्र ओमकार बाईत याच्या समवेत दुचाकीवरुन 3 ऑगस्ट रोजी कल्याण येथे आली. यानंतर डोंबिवली पूर्व येथील दिनेश रामकरण यादव व मंजू दिनेश यादव यांच्या सोबत दुचाकीवरुन चौघेही माळशेज घाट (Malshej Ghat) मार्गे नाणेघाट येथे आले. त्याठिकाणी त्यांनी रात्रीचा मुक्काम केला.
सकाळी चौघेजण जीवधन किल्ला पाहण्यासाठी गेले होते. किल्ला पाहून परत येत असताना रुचिकाचा पाय घसरला आणि ती दरीत पडली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तिला तातडीने जुन्नर ग्रामीण रुग्णालयात (Junnar Rural Hospital) उपचारासाठी नेण्यात आले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

 

 

पुढील शिक्षणासाठी परदेशात जाणार होती

तीन महिन्यापूर्वीच तिने पीएचडी (Ph.D.) पूर्ण केली होती. पुढील शिक्षणासाठी ती परदेशात
(abroad) जाणार होती. परंतु, अशातच तिच्या मृत्यूची बातमी समजली. आमच्यासह तिच्या
कुटुंबासाठी ही अत्यंत वेदनादायी घटना आहे, असे ‘आयुका’चे संचालक सोमक रायचौधरी यांनी सांगितले.

 

Web Title : pune crime delhi woman 30 dies after falling into gorge at jivdhan fort

 

हे देखील वाचा :

Pune Crime | आरक्षित जमीनीच्या वादातून पंचायत समिती सभापतीने दाखवले पिस्तुल, FIR दाखल

Modi Government | मोदी सरकार 2.0 साठी खास आहे 5 ऑगस्ट, यावेळी सुद्धा विरोधकांना देणार का आश्चर्याचा धक्का?

Tokyo Olympics | हॉकीतील 4 दशकाचा दुष्काळ समाप्त ! भारताने जर्मनीवर 5-4 ने मात करुन ‘कांस्य’ पटकाविले

 

Related Posts