IMPIMP

Pune Crime | पोलीस उपनिरीक्षक पतीच्या जागेवर अनुकंपा तत्वावर नोकरी मिळविण्यासाठी बनविले बनावट मार्कलिस्ट-प्रमाणपत्र

सीआयडीची केली फसवणूक, चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

by nagesh
Pune Pimpri Crime | A tempo transporting animals for slaughter was caught in Pimpri Chinchwad

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पोलीस उपनिरीक्षक (Police Sub Inspector) याच्या मृत्युनंतर त्याच्या जागी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळविण्यासाठी त्याच्या पत्नीने बनावट मार्कलिस्ट व प्रमाणपत्र (Fake Marklist And Certificate) तयार करुन राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे Criminal Investigation Department Maharashtra (CID) अपर पोलीस महासंचालक Additional Director General of Police (ADGP) यांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी वाशिम येथील एका महिलेविरूध्द चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, आरोपी महिलेचे पती हे अंगुलीमुद्रा पोलीस उपनिरीक्षक या पदावर वाशिम येथे सीआयडीच्या (CID Maharashtra) कार्यालयात कार्यरत होते. त्यांचे कर्करोगाने २२ सप्टेंबर २०१७ रोजी निधन झाले. त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर नोकरी मिळविण्यासाठी त्यांची पत्नी यांनी २६ ऑक्टोबर २०१७ रोजी सहायक शासकीय दस्तऐवज परिक्षक किंवा लिपिक या पदावर नोकरी मिळविण्यासाठी विनंती अर्ज केला. त्यासाठी त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (Yashwantrao Chavan Maharashtra Open University) यांचेकडील बी. ए. तृतीय (BA Third Year) वर्षाचे मार्कलिस्ट व प्रमाणपत्र खोटे व बनावट बनवून ते अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग यांना सादर करुन फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Fake Marklist Certificate made to get job on compassionate basis in place of Police Sub Inspector husband Pune CID Maharashtra

 

हे देखील वाचा :

OBC Political Reservation | ओबीसी आरक्षणाच्या विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 34 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Maharashtra Budget-2022 | दिलासादायक अर्थसंकल्प ! पुणे व्यापारी महासंघाकडून अर्थसंकल्पाचे स्वागत

 

Related Posts