IMPIMP

Maharashtra Budget-2022 | दिलासादायक अर्थसंकल्प ! पुणे व्यापारी महासंघाकडून अर्थसंकल्पाचे स्वागत

by nagesh
Maharashtra Budget-2022 | Comfortable budget! Budget welcome from Pune Vyapari Mahasangh Mahendra Pitaliya

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनमहाविकास आघाडी सरकारने आज राज्याचा आगामी अर्थसंकल्प (Maharashtra Budget-2022) मांडला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांनी विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget-2022) सादर केला. या अर्थसंकल्पात सरकारकडून विकासाची पंचसूत्री मांडण्यात आली आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. पुणे व्यापारी महासंघाचे (Pune Vyapari Mahasangh) सचिव महेंद्र पितळीया (Secretary Mahendra Pitaliya) यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत करत दिलासादायक अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कोविड महामारीच्या (Covid Epidemic) पार्श्वभूमीवर मंदावलेल्या अर्थचक्राची गती वाढवून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आज अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत (Legislative Assembly) अर्थसंकल्प (Maharashtra Budget-2022) मांडताना केलेला दिसतो. त्यात प्रामुख्याने शेती व आरोग्य यावर भरीव तरतूद कारण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रासाठी (Health Sector) 11 हजार कोटींचा निधी, पुण्यात (Pune) 300 एकरवर इंद्रायणी मेडिसिटी (Indrayani Medicity) उभारणे याचा समावेश आहे.

 

 

महेंद्र पितळीया यांनी म्हटले, स्टार्ट अपसाठी (Start Up) 100 कोटी रुपयाची तरतूद नवउद्योजकांसाठी उत्साह वर्धक आहे. ई – वाहनांना (E-Vehicles) प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात 5000 चार्जिंग स्टेशन (Charging Station) उभारण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. CNG वरील कर 13.5 % वरून 3 % पर्यंत कमी केल्याने दिलासा मिळाला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुणे शहराच्या दृष्टीने विविध मेट्रो प्रकल्पांसाठी (Metro Project) तरतूद,
फुले वाड्यासाठी 100 कोटींचा निधी, पुणे रिंग रोडसाठी (Ring Road) 1500
कोटींच्या निधीची तरतूद हे स्वागतार्ह आहे.अडचणीत सापडलेल्या छोट्या व
मध्यम व्यावसायिकांसाठी कराच्या (Tax) थकबाकीची तडजोड योजना फायदेशीर ठरणार असल्याचे महेंद्र पितळीया यांनी सांगितले.

 

 

Web Title :- Maharashtra Budget-2022 | Comfortable budget! Budget welcome from Pune Vyapari Mahasangh Mahendra Pitaliya

 

हे देखील वाचा :

Pune Corporation | मुंढवा येथील 24 मी. रुंदीचा डी.पी.रस्ता क्रेडीट नोटच्या बदल्यात विकसित करणार; स्थायी समितीच्या अखेरच्या बैठकीत मान्यता

Pune Crime | निर्लज्जपणाचा कळस ! पुतण्यानेच केला चुलतीवर बलात्कार; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Maharashtra Budget 2022 | पुण्यातील वाहतूक, आरोग्य सेवेला अर्थसंकल्पात प्राधान्य ! छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी 250 कोटींची तरतूद स्वागतार्ह निर्णय – माजी आमदार मोहन जोशी

 

 

Related Posts