IMPIMP

Pune Crime | शिक्षकेच्या पती अन् त्याच्या मैत्रिणीकडून फेसबुकवर अश्लील व घाणेरडया पोस्ट, महिलेनं उचललं मोठं पाऊल

by nagesh
Pune Crime | Husband Defames Wife Through Fake Facebook Account; Incidents in Chandannagar area

पुणे न्यूज (Pune News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)–  Pune Crime | पुण्यातील एका शिक्षिका महिलेनं आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पती आणि त्याच्या मैत्रिणीकडून सोशल मीडियावर केलेल्या विचित्र प्रकारामुळे शिक्षिकेनं गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आलीय. पती आणि तिच्या मैत्रिणीकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून शिक्षिकेनं गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. दिपाली नितीन गायकवाड (रा. येरवडा परिसर, लक्ष्मीनगर) असं आत्महत्या केलेल्या शिक्षिकेचं नाव आहे. तर, आरोपी पती नितीन वसंत गायकवाड (वय, 36) आणि पतीची मैत्रीण रिया चव्हाण (रा. रामनगर) या दोघांविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा (Pune Crime) यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्याद (Complaint) मृत शिक्षिकेचे वडील मारुती यशवंत चव्हाण दिली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याबाबत माहिती अशी की, मृत शिक्षिका दिपाली (Deepali) यांचा काही वर्षांपूर्वी नितिन गायकवाड (Nitin Gaikwad) याच्याशी लग्न झालं. प्रारंभी संसार नीटनेटका सुरु होता.
दिपाली ह्या पुण्यातील एका खाजगी शाळेत शिक्षिका (Teacher) म्हणून कार्यरत होत्या.
तर नितीन हा ठेकेदारीची कामं घेतं होतं. त्यांना 2 मुलीही आहे.
मात्र, गेल्या 3 वर्षांपासून पीडितेला पती नितीन आणि त्याची मैत्रिण रिया चव्हाण (Riya Chavan) यांच्याकडून सतत त्रास सुरू झाला.
अनेक गोष्टी काढून ते दोघे मृत शिक्षिका दिपालीचा मानसिक आणि शारिरीक छळ करत होते.
तसेच, आरोपींनी दिपाली यांच्या नावे फेसबुकवर खोटे अकाउंट (FB Fake Account) काढून त्यांच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना अश्लील SMS पाठवून बदनामी केली.
त्यानंतर, वेगवेगळ्या कारणांवरून संशय घेत पतीकडून वारंवार शिवीगाळ केली जात होती.
या दोघांच्या त्रासाला त्रस्त होऊन मृत शिक्षिकेनं (17 सप्टेंबर 2019) रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे.

 

 

या दरम्यान, मृत शिक्षिकेच्या वडिलांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) जाऊन आरोपी पती नितीन आणि त्याची मैत्रिण रिया विरोधात फिर्याद दिली होती.
मात्र, त्यांनतर कोरोनाच संकट दाखल झालं.
फिर्यादीकडून तक्रारीबाबत कोणतीही भूमिका घेतली नाही.
नंतर आता मृत शिक्षिकेच्या वडिलांनी पुन्हा एकदा येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) गुन्हा (Pune Crime)दाखल केला आहे.
याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title : pune crime | female teacher commits suicide after harassment by husband and his female friend

 

हे देखील वाचा :

Crime News | कलयुग ! पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने घेतली अग्निपरीक्षा, हातावर जाळला कापूर विश्वास न बसल्याने पाजले विष

Sawan Somvar | महादेवाची पूजा करण्यासाठी बेलाच्या पानाचं महत्व काय? जाणून घ्या महत्व

Raj Kundra Porn Film Case | पॉर्न प्रकरणी पोलीस कोठडीला आव्हान देणारी राज कुंद्राची याचिका फेटाळली

 

Related Posts