IMPIMP

Crime News | कलयुग ! पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने घेतली अग्निपरीक्षा, हातावर जाळला कापूर विश्वास न बसल्याने पाजले विष

by nagesh
crime news | husband took test of his wife to prove innocency burnt camphor on palm and gave poison

गोरखपुर न्यूज (Gorakhpur News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)  Crime News | यूपीच्या गोरखपुर जिल्ह्यात एक हैराण करणारे प्रकरण घडले आहे. येथे एका व्यक्तीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्याने पत्नीला मरणाच्या दारात नेऊन ठेवले. संशयापोटी या इसमाने पत्नीची अग्निपरीक्षा घेतली. तरीही विश्वास न बसल्याने तिला विष पाजले. यानंतर स्वतःदेखील विष प्यायला (Crime News). सध्या दोघांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

काय आहे पूर्ण प्रकरण

हे प्रकरण गोरखपुर जिल्ह्यातील पिपराइच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरकुलही गावातील आहे.
येथे राहणार्‍या तरूणाचा विवाह 12 वर्षापूर्वी गुलरिहांतील जैनपुरच्या काजीपुर टोला येथे राहणार्‍या एका तरूणीशी झाला होता. दोघांना तीन मुलेसुद्धा आहेत.

 

महिलेच्या वडिलांचा आरोप आहे की, जावई त्यांच्या मुलीच्या चारित्र्यावर संशय घेत होता.
एक महिन्यापूर्वी त्याने मुलीला अग्निपरीक्षा देण्यास सांगितले होते.
त्याने तिच्या हातावर कापूर ठेवला आणि म्हटले तू पवित्र असल्यास काहीही होणार नाही.
मात्र त्याने जेव्हा तिच्या हातावरील कापूर पेटवला तेव्हा हात गंभीर प्रकारे भाजला.
तिच्या हातावर आजूनही उपचार सुरू आहे.

 

 

औषधाच्या बहाण्याने पाजले विष

तर, गुरुवारी उपचार करण्याच्या बहाण्याने त्याने आपल्या पत्नीला विष प्यायला दिले.
त्याने म्हटले हे औषध प्यायल्यानंतर सर्वकाही ठिक होईल. महिलेन पतीवर विश्वास ठेवून विष प्यायले.
ज्यानंतर तरुणाने स्वताही विष प्यायले.
तसेच आपल्या मुलांना सुद्धा विष पाजण्याचा त्याने प्रयत्न केला.
परंतु पत्नीने त्याच्या हातातून बाटली हिसकावून फेकून दिली.

 

दोघांना भटहटच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करण्यात आले आहे.
जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तर, भटहट पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी सांगितले की त्यांना अद्यापपर्यंत या घटनेची माहिती मिळालेली नाही.

 

 

Web Title : crime news | husband took test of his wife to prove innocency burnt camphor on palm and gave poison

 

हे देखील वाचा :

Sawan Somvar | महादेवाची पूजा करण्यासाठी बेलाच्या पानाचं महत्व काय? जाणून घ्या महत्व

Raj Kundra Porn Film Case | पॉर्न प्रकरणी पोलीस कोठडीला आव्हान देणारी राज कुंद्राची याचिका फेटाळली

Pune Crime | घरकाम करणार्‍या महिलेने तिजोरीसह 25 लाखांचे दागिने, परदेशी चलन केले लंपास; कोंढव्यातील घटना

 

Related Posts