IMPIMP

Pune Crime | बॉयफ्रेंड सोबत भांडून आली एसटी स्टँडवर, सुरक्षा रक्षकाने केला बलात्कार; पुण्यातील धक्कादायक प्रकार

by nagesh
Pune Crime News | Yerwada Police Arrest Tadipaar Criminal

चाकण : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | बॉयफ्रेंड (Boyfriend) सोबत भांडण करुन बस स्थानकावर आलेल्या महिलेला सुरक्षा रक्षकाने (Security Guard) बस स्थानकावर न थांबण्याची विनंती केली. तसेच याठिकाणी बेवडे असतात तुमच्या जीवाला धोका असल्याचे सांगून महिलेचा विश्वास संपादन केला. एसटी स्टँड (Chakan ST Stand) सुरक्षा रक्षकाने महिलेला आपल्या खोलीवर थांबवण्यास सांगून घेऊन गेला. त्याठिकाणी तिच्यावर बलात्कार (Rape In Pune) केला. ही घटना रविवारी (दि. 24) मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास नाणेकरवाडी (Nanekarwadi) गावच्या हद्दीत (Pune Crime) घडली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी 27 वर्षीच्या पीडित महिलेने चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) फिर्याद दिली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी एका अनोळखी 35 ते 40 वयाच्या व्यक्तीवर 376, 450,50,6 प्रमाणे गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिच्या बॉयफ्रेंड सोबत नाणेकरवाडी येथे राहण्यास आहे. फोनवर बोलण्याच्या कारणावरून तिचे आणि बॉयफ्रेंडचे भांडण (Dispute) झाले. त्यामुळे महिला तिच्या मुलाला घेऊन चाकण एसटी स्टँड येथे आली. त्याठिकाणी एसटी स्टँड सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या अनोळखी व्यक्तीने महिलेला याठिकाणी बेवडे असतात थांबू नका असे सांगितले. महिलेने घरी जायचे असल्याचे सांगितल्यानंतर सुरक्षा रक्षकाने तिला त्याच्या खोलीत थांबण्यास सांगितले. आरोपीने महिलेला मदत करण्याच्या बहाण्याने खोलीवर घेऊन गेला. महिला झोपली असताना आरोपी खोलीत आला. त्याने महिलेला जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देऊन बलात्कार केला. पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | FIR against ST stand security guard in rape case ; Shocking incident in chakan of Pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime | हिंजवडी आणि भोसरीत महिलांच्या विनयभंगाच्या दोन घटना

Mutual Fund SIP | रु. 100 मंथलीपासून सुरू करू शकता गुंतवणूक, ‘या’ स्कीम्समध्ये 5 वर्षात डबल-ट्रिपल ‘वेल्थ’; काय म्हणतात एक्सपर्ट

How To Care Heart In Summers | उन्हाळ्यात आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यावी?

 

Related Posts