IMPIMP

Pune Crime | मुलगा होत नसल्याने सासरच्यांनी केला छळ, सुनेच्या आत्महत्ये प्रकरणी 4 जणांवर FIR

by nagesh
Pune Crime | A case of fraud has been registered against builders Mahesh Thorat and Shirish Lodha in Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन   – दोन्ही वेळेला मुली झाल्याने सासरच्या लोकांनी सूनेचा छळ करण्यास सुरुवात केली. सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून सूनेने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. ही घटना पुण्यातील (Pune Crime) चतु:श्रृंगी परिसरातील संभाजी हौसिंग सोसायटीमध्ये घडली आहे. आरती अमोल जाधव Aarti Amol Jadhav (वय-27) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पतीसह चार जणांविरोधात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पती अमोल अशोक जाधव, सासु वंदना अशोक जाधव, सासरे अशोक जाधव, नणंद कल्याणी अभिजीत जगताप (सर्व रा. 6/24, संभाजी हौसिंग सोसायटी, भारतीय विद्या भवन शाळेमागे) यांच्या विरोधात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरती यांची आई मंदा दिलीप कुशाळकर Manda Dilip Kushalkar (वय-48 रा. आस्था सहवास, रश्मी स्टारसिटी बिल्डींग समोर, नालासोपारा (ई) पालघर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल आणि आरती यांचे जून 2012 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर आरती सासरी नांदत असताना तिचा पती आणि नातेवाईकांनी तिचा छळ सुरु केला. आरतीला दोन्ही वेळेला मुलीच झाल्याचा राग सासरच्यांना होता. सिझरमुळे आमचा पैसा वाया गेला. तुला मुलगा होत नाही. चपात्या करता येत नाही. तू घरात काम करीत नाही, असे बोलून आरतीचा मानसिक छळ सुरु केला. सततच्या त्रासाला कंटाळून आरतीने 7 जून रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एल.एस. उकिर्डे (API L.S. Ukirde) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | FIR filed against 4 persons in Sune’s suicide case

 

हे देखील वाचा :

ZP Pune Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! पुणे जि.प. मध्ये ‘या’ पदांसाठी लवकरच भरती

Pune Crime | पुण्याच्या कोरोना लसीकरण केंद्रामधील डाटा एन्ट्रीच्या कॉम्प्युटरची चोरी

Driving License | ‘या’ अँपद्वारे ‘DL’ करू शकता फोनमध्ये डाऊनलोड; जाणून घ्या

Pune Crime | पुण्यातील महिलेला वडापावची ‘तलफ’ पडली महागात, चोरट्यांचा पर्समधील 8 लाखाच्या दागिन्यावर ‘डल्ला’

 

Related Posts