IMPIMP

Pune Crime | पुण्यात मार्केटयार्ड परिसरात गोळीबार करुन 28 लाखांची रोकड लुटली, दिवसाढवळ्या घडलेल्या प्रकारामुळे खळबळ

by nagesh
Pune Crime News | Businessman fires at firecrackers in Kalyaninagar; After asking "Bhayya kaha ke ho", fired in anger, the youth smashed the car

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime | पुण्यातील मार्केटयार्ड (Marketyard Pune) परिसरात गोळीबार (Firing In Pune) करुन रोकड लुटल्याची (Looted) धक्कादायक घटना शनिवारी (दि.11) दुपारी घडली. चोरट्यांनी गोळीबार करत 28 लाखांची रक्कम घेऊन पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Pune City Police) घटनास्थळी धाव (Pune Crime) घेतली. पाच ते सहा आरोपी पी.एम. अंगडिया (P.M. Angadia) कार्यालयात आले. त्यांनी गोळीबार करुन पैसे लुटले. भरदिवसा झालेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

घटनेची माहिती मिळताच मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील (Market Yard Police Station) पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मार्केटयार्ड परिसरात पी.एम. अंगडिया यांचे कार्यालय आहे. ते कुरिअर (Courier) कार्यालय असल्याची माहिती मिळत आहे. आज याठिकाणी पाच ते सहा जण आले त्यांनी गोळीबार करून 28 लाखांची रोकड घेऊन फरार झाले. (Pune Crime)

 

तक्रारदार हे आज सकाळी 11 च्या सुमारास कार्यालयात आले. त्यानंतर त्यांनी पैसे तपासून पाहिले.
त्यानंतर पावणे बारा च्या सुमारास पाच ते सहा आरोपी ऑफिसमध्ये आले. त्यांनी दारातून पिस्टल दाखवली.
त्यानंतर दुसऱ्या साथीदाराने त्यांना ढकलून कार्यालयाच्या बाहेर काढलं. कार्यालयात असलेल्या काचेवर गोळीबार
करुन काच फोडली. त्यानंतर आरोपी पैसे घेऊन पळून गेले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिली.
या घटनेत कोणी जखमी झाले नाही. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरु आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :- Pune Crime | firing at market yard area of pune by 6 looted 28 Lakh rupees senior police officers of pune city police are on the spot

 

हे देखील वाचा :

Deepak Kesarkar | …म्हणून दीपक केसरकर आणि नितेश राणे यांची युती

Pune Pimpri Crime | पनवेल महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणाला लाखोंचा गंडा, 3 जणांना अटक

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला लाखोंचा गंडा, आरोपीला पकडण्यासाठी पुणे पोलिसांची नवी शक्कल

 

Related Posts