IMPIMP

Deepak Kesarkar | …म्हणून दीपक केसरकर आणि नितेश राणे यांची युती

by nagesh
Deepak Kesarkar | Deepak kesarkar nitesh rane come together bjp wins 1 seat in sindhudurg sawantwadi sangh elections

सावंतवाडी : सरकारसत्ता ऑनलाईन – Deepak Kesarkar | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी खरेदी विक्री संघाची (Sawantwadi Taluka
Sahakari Kharedi-Vikri Sangh Ltd.) निवडणूक आज (दि. 12) पार पडत आहे. यावेळी शिवसेनेला या निवडणुकीत रोखण्यासाठी शिंदे गटाचे
आमदार दीपक केसरकर (Dipak Kesarkar) आणि भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) एकत्र आले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत एकूण 15 जागा आहेत. त्यातील एक जागा बिनविरोध झाली आहे. भाजपचा (BJP) एक उमेदवार निवडून
आला आहे. उरलेल्या 14 जागांसाठी 28 उमेदवार रिंगणात उभे आहेत. या संघावर सध्या महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) पकड आहे.
त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात भाजप आणि शिंदे गट एकवटले आहेत. त्यामुळे ही लढत अटीतटीची होण्याची चिन्हे आहेत.
महाविकास आघाडीला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजप आणि शिंदे गट जिवाचे रान करत आहेत. (Deepak Kesarkar)

 

महाविकास आघाडीच्या हातून हा संघ काढून घेण्यासाठी शिंदे गटाचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि
नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे जिल्हा बँक संचालक महेश सारंग, अशोक दळवी,
विद्यापान जिल्हा बँक संचालिका विद्या बांदेकर आदी उमेदवार मैदानात आहेत. तर दुसरीकडे या निवडणुकीत दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातील हा खरेदी विक्री संघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, काँग्रेसचे विकास सावंत मैदानात आहेत.सकाळी आठ ते चार मतदान होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता मतमोजनीला सुरुवात होणार आहे.
या निवडणुकीत 944 सभासद मतदान करुन उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत.
दीपक केसरकर यांच्या मतदार संघातील निवडणूक असल्याने ती अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे.
दीपक केसरकर आज दुपारी सावंतवाडीत दाखल होणार आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Deepak Kesarkar | Deepak kesarkar nitesh rane come together bjp wins 1 seat in sindhudurg sawantwadi sangh elections

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | पनवेल महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणाला लाखोंचा गंडा, 3 जणांना अटक

Pune Pimpri Crime | फेसबुकवर जुळले प्रेमसंबंध, लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला लाखोंचा गंडा, आरोपीला पकडण्यासाठी पुणे पोलिसांची नवी शक्कल

 

Related Posts