IMPIMP

Pune Crime | व्याजाच्या पैशांची वसुलीसाठी फ्लॅट खाली करण्याची धमकी, पती-पत्नीला गुन्हे शाखेकडून अटक

by nagesh
Pune Crime News | Drugs worth 11 lakh seized in two operations in Pune; Catha Idulis Khat, drugs seized for the first time, two foreign nationals arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  Pune Crime | व्यवसायासाठी व्याजाने घेतलेले पैसे फेडल्यानंतरही दामदुप्पट मागणी करुन त्यासाठी राहता फ्लॅट जबरदस्तीने लिहून घेऊन तो खाली करण्यासाठी (Pune Crime) धमकाविणार्‍या पती पत्नी सावकारांना (Moneylender) खंडणी विरोधी पथकाने (Anti Extortion Cell) अटक केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जयराम निवृत्ती पोकळे Jairam Nivritti Pokle (वय-43) आणि हेमा ऊर्फ रेखा जयराम पोकळे Hema alias Rekha Jairam Pokle (वय-36, दोघे रा. धायरी गाव) अशी अटक (Arrest) केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका 40 वर्षाच्या महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी व्यवसायासाठी 15 टक्के व्याजाने (Interest) 6 लाख 45 हजार रुपये जानेवारी 2021 मध्ये घेतले होते. त्यांनी व्याजापोटी मे 2022 पर्यंत 9 लाख 45 हजार रुपये दिले आहेत. तसेच त्यांच्या एका मैत्रिणीने त्याच्याकडून 5 लाख 50 हजार रुपये घेतले होते. तिनेही व्याजापोटी मे 2022 पर्यंत 7 लाख 32 हजार रुपये व्याज दिले.

 

पोकळे याने फिर्यादी यांच्या नावावर 500 रुपयांचा समजूतीचा करारनामा
(Memorandum of Understanding) जबरदस्तीने लिहून घेतला.
त्यात त्याने फिर्यादी यांचे 6 लाख 45 हजार व त्यांच्या मैत्रिणीचे 5 लाख 50 हजार रुपये यांच्या बदल्यात
दोघींकडून मुद्दल व व्याजापोटी एकूण 18 लाख 83 हजार 500 रुपये 15 दिवसाच्या मुदतींमध्ये मागणी करीत
असून ते न दिल्यास फिर्यादी यांचा राहता फ्लॅट खाली करुन देण्याबाबत जबरदस्तीने लिहून घेतले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फिर्यादी यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली.
फिर्यादी व त्यांच्या मैत्रिणीकडून मुद्दल, व्याज व दंडापोटी 21 लाख 39 हजार रुपयांची बळजबरीने मागणी
केल्याने शेवटी त्यांनी घाबरुन पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Husband and wife arrested by crime branch after threatening to demolish flat to recover interest money

 

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक! शिवीगाळ केल्याने 11 वर्षाच्या मुलाची आत्महत्या, मायलेकींवर FIR

Parambir Singh | परमबीर सिंह खंडणी प्रकरणातील 2 निलंबित पोलिस अधिकारी पुन्हा राज्य पोलिस दलाच्या सेवेत, जाणून घ्या प्रकरण

Marriage Bank Loan | लग्न थाटामाटात करायचंय? मिळू शकते लोन, बँकेत जाण्याचीही नाही गरज, Online असं करा Apply

 

Related Posts