IMPIMP

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून आंबेगाव खुर्द परिसरात दोघांवर कोयत्याने वार, 8 जणांवर FIR

by nagesh
Pune Crime | Vehicles vandalized in Narhe area of pune sinhagad road police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुर्वी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी 8 जणांच्या टोळक्याने दोन तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना पुण्यातील (Pune Crime) आंबेगाव खुर्द (Ambegaon Khurd) परिसरात घडली आहे. याप्रकरणी आठ जणांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (bharati vidyapeeth police station) गुन्हा (FIR) दाखल असून आरोपी हे सराईत गुन्हेगार आहे. ही घटना रविवारी (दि.22) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

बंटी ऐनापुरे, रोहीत पाटेकर, औदत्य उर्फ बबलु फटके, लड्डी गायकवाड, शुभम हिरे, सार्थक मिसाळ, तुषार पवार, दरोडे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर आकाश अरुण पवार (वय-28 रा. गणराज मित्र मंडळाजवळ, जांभुळवाडी रोड, आंबेगाव बु.) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन आरोपींनी लोखंडी कोयत्याने आकाशवर हल्ला केला.
आरोपींनी फिर्यादीच्या उजव्या हाताच्या मनगटावर, पोटावर आणि पाठीवर वार केले.
तर त्याचा मित्र प्रथमेश येणपुरे याच्या डोक्यात कोयत्याने मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
यानंतर त्याठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांवर कोयत्याने मारुन वाहनांची तोडफोड केली.
तसेची कोयते हातात धरुन परिसरात दहशत माजवली.
आकाश पवार याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आठ जणांविरोधात आर्म अ‍ॅक्ट (Arm Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कवठेकर (API Kavthekar) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | In Ambegaon Khurd area, two persons were stabbed and 8 persons were arrested

 

हे देखील वाचा :

Narayan Rane | नारायण राणेंच्या अटकेबाबत नाशिक पोलीस आयुक्तांची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाले…

Pune Corporation | पुण्याच्या बाणेर परिसरातील सर्वाधिक भूखंडांचा होणार लिलाव

Narayan Rane | केंद्रीय मंत्र्याचा अटकपुर्व जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळला, पोलिसांकडून नारायण राणेंना अटक

 

Related Posts