IMPIMP

Narayan Rane | नारायण राणेंच्या अटकेबाबत नाशिक पोलीस आयुक्तांची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाले…

by nagesh
nashik police commissioner deepak pandey gives information of action against narayan rane
नाशिक : सरकारसत्ताऑनलाइन–  केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आहे. राणे यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मुंबई, पुणे, नाशिक अन्य याठिकाणी देखील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, असे वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला आहे. यावरून राणेंच्या अटकेची तयारी नाशिक पोलिसांनी केली आहे. अटकेवरून नारायण राणे (Narayan Rane) चांगलेच भडकले आहेत. ‘अटक करायला मी नॉर्मल माणूस वाटलो का? अटकेचा आदेश काढणारे राष्ट्रपती आहेत का?,’ असा सवाल राणेंनी यांनी केलाय. यावरून आता नाशिक पोलीस आयुक्तांनी (Nashik Police Commissioner) स्पष्टच उत्तर दिलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे (Police Commissioner Deepak Pandey) यांनी राणेंच्या संभाव्य कारवाई बाबत माध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे.
त्यावेळी सांगतांना ते म्हणाले की, ‘शिवसेनेचे शहरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या तक्रारीवरून नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
शिवसैनिकांच्या भावना दुखावल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गुन्ह्याचा प्रकार आणि गांभीर्य बघता नारायण राणे यांना अटक करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय.
अटक करण्यासाठी पथक रवाना झालं आहे.
कायद्याप्रमाणे सर्व गोष्टी होतील. नारायण राणेंना अटक करून कोर्टात हजर केलं जाईल, कोर्ट जो आदेश देईल त्यानुसार पुढील कारवाई होईल.
राणेंनी आपलं निर्दोषत्व कोर्टात सिद्ध करावं,’ अशी माहिती पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिलीय.

दरम्यान, पुढे बोलताना पोलीस आयुक्त पांडे (Police Commissioner Deepak Pandey) म्हणाले, ‘नारायण राणे हे राज्यसभेचे सदस्य आहेत.
त्यामुळं त्यांच्यावरी अटकेच्या कारवाईनंतर राज्यसभेचे अध्यक्ष असलेल्या उपराष्ट्रपतींना त्याचबरोबर, इंटेलिजन्स ब्युरो, SIT, जिल्हा दंडाधिकारी, न्याय दंडाधिकारी या सर्वांना माहिती दिली जाईल.
राज्यघटनेनुसार राष्ट्रपती आणि राज्यपाल या दोघांवर क्रिमिनल केसेसमध्ये अटकेची कारवाई करता येत नाही. बाकीच्यांना ती मुभा नाही.
‘फॅक्ट ऑफ द केस’ पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे.
कारवाईची गरज का वाटली याची संपूर्ण माहिती आदेशात देण्यात अली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

 

Web Title : nashik police commissioner deepak pandey gives information of action against narayan rane

 

हे देखील वाचा :

Pune Corporation | पुण्याच्या बाणेर परिसरातील सर्वाधिक भूखंडांचा होणार लिलाव

Narayan Rane | केंद्रीय मंत्र्याचा अटकपुर्व जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळला, पोलिसांकडून नारायण राणेंना अटक

Narayan Rane | नारायण राणेंच्या वक्तव्यानंतर गोंधळ ! नाशिकमध्ये BJP कार्यालयावर दगडफेक, मुंबईत भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा

 

Related Posts