IMPIMP

Pune Crime | कोंढव्यात पतीने पत्नीला चौथ्या मजल्यावरुन ढकलले

by nagesh
 Pune Crime | in pune a husband pushed his wife from the fourth floor if you read the reason you will be annoyed

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुण्यामध्ये पतीने पत्नीला चौथ्या मजल्यावरुन ढकलून (Husband and Wife) दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यातील (Pune Crime) कोंढवा परिसरात घडली असून याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक (Arrest) केली आहे. इमारतीच्या सुपरवायझर सोबत पत्नीने भांडण केले नसल्यामुळे संतापलेल्या पतीने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) पती विरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नितीन दशरथ दहिरे Nitin Dashrath Dahire (वय-32) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात 25 वर्षीय पत्नीने तक्रार (FIR) दिली आहे. हा प्रकार शनिवारी दुपारी घडला आहे. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरातमध्ये एका निर्माणधीन इमारतीत फिर्यादी या पतीसोबत राहतात. या ठिकाणी लाईट फिटिंगचे (Light Fitting) काम सुरु आहे. (Pune Crime)

 

 

काही दिवसांपूर्वी नितीन दहिरे याचे लाईट फिटिंग करण्यासाठी आलेल्या सुपरवायझर (Supervisor) सोबत भांडण झाले होते.
त्यावेळी पत्नीने आपली बाजू घेऊन सुपरवायझर सोबत भांडण केले नसल्याचा राग त्याच्या मनात होता. याच कारणावरुन त्यांच्यामध्ये शनिवारी भांडण झाले.
हे भांडण एवढे विकोपाला गेले की, पतीने रागाच्या भरात पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण (Beating) केली.
एवढेच नाही तर चौथ्या मजल्यावरुन (Fourth Floor) लिफ्टसाठी सोडलेल्या मोकळ्या जागेतून खाली ढकलून दिले. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :- Pune Crime | in pune a husband pushed his wife from the fourth floor if you read the reason you will be annoyed

 

हे देखील वाचा :

Dental Care Tips | दात पिवळे आहेत का? ‘या’ 4 परिणामकारक घरगुती उपायांनी होतील पांढरे शुभ्र आणि चमकदार

Pune Congress | PM नरेंद्र मोदी यांनी मुलींबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल पुणे शहर महिला काँग्रेसतर्फे निषेध

Priyanka Chopra Jonas | प्रियंका चोप्राला तिच्या प्रियकरासोबत रूममध्ये रंगेहात पकडले, संतापलेल्या मावशीने केले ‘हे’ काम

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2947 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts