IMPIMP

Pune Crime | तृतीय पंथ्यांचं वेषांतर करून चोऱ्या करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

by nagesh
Pune Crime | Excitement over finding naked body of a couple in a lodge in Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | तृतीय पंथीय (transgender) असल्याचे सांगून वेशबदल करीत चोऱ्या करणाऱ्या एकाला जेजुरी पोलिसांनी (Jejuri Police) बेड्या ठोकल्या आहेत. पोलीसांनी पकडलेला हा भामटा खरंतर तृतीय पंथी नसल्याचे (Pune Crime) उघडकीस आले आहे. अभिषेक रावसाहेब भोरे (वय 27 रा. उत्कर्षनगर, विजापूर नाका सोलापूर) असं चोरी करणा-या भामट्याचे नाव आहे. अभिषेक भोरे (Abhishek Bhore) याला सासवड कोर्टानं (Saswad Court) 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत माहिती अशी, जेजुरीतील एका वाघ्या मुरुळीचा व्यवसाय करणाऱ्या महिलेला आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी सहकलाकाराची गरज होती.
तिच्या फेसबुकवर राणी किन्नर म्हणून एक फ्रेंड होती. तिने तिला सह कलाकार म्हणून काम करण्यासाठी इच्छुक असल्याचे (Pune Crime) सांगितले.
फेसबुक फ्रेंड असल्याने तसेच 1-2 वेळा जेजुरीत येऊन या मुरुळीकडे मुक्काम केलेला असल्याने तिनेही कसलीच शंका न बाळगता त्याला सहकलाकार म्हणून घेण्याचे निश्चित केले.
आणि जेजुरीला बोलावून घेतले होते. हा भामटा (अभिषेक भोरे) (Abhishek Bhore) तृतीय पंथीयच्या वेषात तिच्याकडे 2 दिवस राहिला.
जागरण, गोंधळ पार्टी सुरू होणार असल्याच्या आनंदात सर्व मग्न होते.
याचा फायदा घेत त्यानं पहाटेच्या सुमारास दीड तोळा सोन्याचे मंगळसूत्र, व माळ, 6 हजार रुपये रोख, असे एकूण 60 हजारांचा ऐवज लपांस केला.
यानंतर महिलेनं या प्रकाराबाबत जेजुरी पोलिसांत (Jejuri Police Station) तक्रार (Pune Crime) दिली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दरम्यान, विशेष म्हणजे त्या भामट्याने आपण सातारा येथील रहिवाशी असल्याचे महिलेला सांगितले होते.
तपासात सदर आरोपी हा सातारा येथील नसून सोलापूरचा रहिवाशी असल्याचे उघड झाले.
यानंतर जेजुरी पोलिसांनी (Jejuri Police) पोलीस निरीक्षक सुनील महाडिक (PI Sunil Mahadik) यांच्या मार्गदर्शनाखाली फिर्यादी मुरुळीसोबत पीएसआय चंद्रकांत झेंडे
(PSI Chandrakant Zende) पोलीस हवालदार दशरथ बनसोडे (Police Constable Dashrath Bansode), प्रवीण शेंडे (Praveen Shende), धर्मराज खांडे (Dharmaraj Khande)
यांचे पथक सोलापूरला तपासाठी रवाना झाले. तेथे आरोपी सापडला. त्यानंतर त्याला ताब्यात घेतलं.

दरम्यान, त्याच्याजवळील सर्व ऐवज पोलिसांनी जप्त केले आहे. सासवड न्यायालयात (Saswad Court) हजर केले असता त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आणखी कुठे असा प्रकार घडला आहे का? याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत (Pune Crime) आहे.

Web Title : Pune Crime | jejuri police handcuffed the thief who disguised himself as a transgender

हे देखील वाचा :

Yuvika Chaudhary Arrest | वादग्रस्त विधानामुळे अभिनेत्री युविका चौधरीला अटक

TRAI Channel List | 1 डिसेंबरपासून TV पाहणे देखील महागणार, करावा लागेल 50 टक्केपेक्षा जास्त खर्च

Maharashtra Unlock | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स रात्री 12 पर्यंत सुरू राहणार

Related Posts