IMPIMP

Yuvika Chaudhary Arrest | वादग्रस्त विधानामुळे अभिनेत्री युविका चौधरीला अटक

by nagesh
Yuvika Chaudhary Arrest | who is yuvika chaudhary know all about the actress who was recently arrested under sc st act for using casteist slur

सरकारसत्ता ऑनलाइन  – सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत जातीवाचक वादग्रस्त विधान करणं प्रिंस नरूल (prince narula) याची पत्नी अभिनेत्री युविका चौधरीला (Yuvika Chaudhary Arrest) चांगलेच महागात पडले आहे. या विधानामुळे तिच्याविरोधात रजत कलसन यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार एससी/ एसटी अ‍ॅक्ट अंतर्गत युविका चौधरीवर गुन्हा (Yuvika Chaudhary Arrest) दाखल करण्यात आला असून तिला अटकही करण्यात आली आहे.

युविका चौधरीने (Yuvika Chaudhary Arrest) काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता.
यामध्ये तिने जातीवाचक वादग्रस्त विधान केले होते. या विधानामुळे सोशल मीडियावर ती चांगलीच ट्रोल झाली होती.
इतकेच नाही तर ट्विटरवर #ArrestYuvikaChoudhary ट्रेंड सुरु करून सोशल मीडियावर अटकेची मागणी होवू लागली हाेती.
तणावाचे वातावरण झाल्याने तिने सोशल मीडियावर माफी मागितली. मी उच्चारलेल्या शब्दांचा अर्थ मला माहीत नव्हता, कोणाला त्रास देण्याचा माझा उद्देश नव्हता.
कोणाच्या भावना दूखावल्यास मी त्यांची माफी मागते. मला आशा आहे की, तुम्ही मला समजून घ्याल असे तिने म्हंटले होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

दरम्यान, युविका चौधरीविरोधात रजत कलसन यांनी तक्रार दिली होती. पोलिसांनी त्यानुसार एससी/ एसटी अ‍ॅक्ट अंतर्गत युविकावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिला अटकही करण्यात आली आहे.
हिसार येथील हांसी पोलिस ठाण्यात तिची चाैकशीही झाली. तीन तासानंतर तिला जामीन मंजूर झाला.

कोण आहे युविका चौधरी ?

युविका चौधरी ही प्रिंस नरूलाची पत्नी आहे. याशिवाय ती एक अभिनेत्री आणि मॉडेलही आहे.
वंडरलॅंड या म्युजिक अल्बमसह डॅडी कूल मुंडे फुल या चित्रपटात युविका चमकली आहे.

 

Web Title : Yuvika Chaudhary Arrest | who is yuvika chaudhary know all about the actress who was recently arrested under sc st act for using casteist slur

 

हे देखील वाचा :

TRAI Channel List | 1 डिसेंबरपासून TV पाहणे देखील महागणार, करावा लागेल 50 टक्केपेक्षा जास्त खर्च

Pune Crime | कौटुंबिक हिंसाचाराच्या खटल्यातून प्रेयसीला वगळण्याचे आदेश

Maharashtra Unlock | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स रात्री 12 पर्यंत सुरू राहणार

 

Related Posts