IMPIMP

Pune Crime | बालसुधारगृहातून सुटताच कर्मचाऱ्यावर कुऱ्हाडीने सपासप वार; येरवड्यातील सरगम हॉटेलजवळील घटना

by nagesh
Pune Crime News | Neighboring hoteliers beat up them for giving free soup on food

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | बालसुधारगृहात झालेल्या वादाचा राग मनात धरुन एका मुलाने बालसुधारगृहातून बाहेर आल्यानंतर कर्मचाऱ्यावर कुऱ्हाडीने (Ax) सपासप वार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. ही घटना येरवडा येथील सरगम हॉटेल जवळ (Sargam Hotel Yerwada) सोमवारी (दि.4) रात्री दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) मुलावर खूनाचा प्रयत्न (Attempted murder) केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. राजेंद्र देडे Rajendra Dede (वय – 51 रा. चिखली – Chikhali) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र देडे हे बालसुधारगृहात कर्मचारी म्हणून काम करतात.
काही दिवसांपूर्वी अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते.
त्याठिकाणी देडे आणि मुलामध्ये वाद (Dispute) झाले होते.
याचा राग मुलाच्या मनात होता. काही दिवसांनी बालसुधारगृहातून मुलाची सुटका झाली होती. (Pune Crime)

 

 

राजेंद्र देडे हे सोमवारी रात्री दहाच्या सुमारास हॉटेलमधून भाजी घेऊन जात होते.
त्यावेळी या मुलाने देडे यांना आडवले.
मी बालसुधारगृहात असताना तुला लई माज आला होता का, तुला दाखवतो, तुझा खेळच खल्लास करतो असे म्हणून त्याने हातातील कुऱ्हाडीने देडे यांच्या डोक्यात वार केले.
हा वार चुकवल्याने त्यांच्या हाताच्या पंजाजवळ, मनगटावर लागून देडे जखमी झाले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वाती ठाकूर (PSI Swati Thakur) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | juvenile detention center the employee was attacked with an ax and a case was registered against the child yerwada sargam hotel area

 

हे देखील वाचा :

Prediabetes Symptoms | प्री-डायबिटीजच्या ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, बचाव करतील ‘हे’ 4 आयुर्वेदिक उपाय

Nilesh Rane on Sanjay Raut | ‘सामना’तील कष्टातून…? राऊतांना निलेश राणेंचा सवाल !

Sonam Kapoor Baby Bump | गरोदरपणात अधिकच सुंदर दिसतीये सोनम कपूर, फोटोमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप

 

Related Posts