IMPIMP

Pune Crime | ‘कोलते पाटील डेव्हलपर्स’ची 44 लाख रुपयांची फसवणूक; पुणे पोलिसांकडून दोघांना अटक

by nagesh
Pune Crime | Inter-state gang arrested by Chathushringi police; 9 crimes revealed, compensation of 5 lakh 74 thousand seized

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुण्यातील नामाकींत ‘कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड’ (Kolte-Patil Developers Limited) या बांधकाम कंपनीची (Pune Crime) त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी 44 लाख रुपयांची फसवणूक (fraud) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक (Arrested) केली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

याबाबत माहिती अशी, फिर्यादी हर्षल नावगेकर (Hershal Navgekar) हे कोलते-पाटील डेव्हलपर्समध्ये सिनियर मॅनेजर म्हणून नोकरी करतात. त्यांच्या कंपनीमध्ये यापूर्वी राठी, साखळे, भिलारे आणि पाटील हे काम करीत होते. कोलते पाटील डेव्हलपर्सच्या ग्राहक असलेल्या काही वेंडर कंपन्यांसोबत असलेल्या आर्थिक व्यवहारांचा आरोपींनी दुरुपयोग केला. या आरोपींनी 15 जून 2018 ते 2 सप्टेंबर 2019 या कालावधीत कंपनीच्या रेकॉर्डवर नसलेल्या बोगस व्हेंडर कंपन्यांच्या नावाने पेमेंट केले. त्यातील पैसे स्वतःच्या फायद्याकरता वापरले. तसेच, कंपनीची अधिकृत व्हेंडर कंपनी असलेल्या ‘स्टील पॉईंट’च्या नावाने खोटे आणि बोगस कागदपत्रे तयार बँकेत अकाऊंट काढले. (Pune Crime)

दरम्यान, यानंतर कंपनीतील कॅन्सल केलेला चेक त्या खात्यावर डिपॉझिट केला. त्यातून पैसे काढून घेऊन एकूण 44 लाख 1 हजार 637 रुपयांची फसवणूक केली. कंपनीकडून यासंदर्भात गुन्हे शाखेकडे (Crime Branch) तक्रार दिली होती. यानूसार अमोल गेंदलाल साखळे (Amol Gendlal Sakhale), कुलदीप भिलारे (Kuldeep Bhilare), चेतन पाटील (Chetan Patil), महेश बालकिशन राठी (Mahesh Balkishan Rathi) अशी गुन्हा (FIR) दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी राठी आणि पाटील या दोघांना अटक (Arrested) केली आहे. याप्रकरणी अधिक तपास एपीआय प्रकाश मोरे (API Prakash More) करीत आहेत.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

Web Title :- Pune Crime | kolte patil developers 44 lakh fraud two arrested by pune police crime branch

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना नवीन वर्षात मिळणार भेट ! सॅलरीत जमा होणार ‘हा’ अलाऊन्स, लवकर पूर्ण करा हे काम

7th Pay Commission | ‘ही’ गोष्ट वाढल्याने कर्मचार्‍यांच्या पगारात होईल मोठी वाढ! 31,740 रुपयांपर्यंत होऊ शकते वाढ

Pune Crime | प्रेयसी आणि प्रियकराचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न; प्रेयसीचा मृत्यू, पुणे जिल्ह्यातील घटना

 

Related Posts