IMPIMP

Pune Crime | पहिल्या पतीपासूनच्या मुलांना पैसे पाठविण्याच्या कारणावरुन पत्नीचा डोक्यात दगड घालून खून; लोणी काळभोर परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime News | A 13-year-old girl was killed and thrown into the canal, the father tried to commit suicide by drinking poison

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पहिल्या पतीपासून झालेल्या मुलांना कामातून मिळालेले पैसे पाठवित असल्याच्या कारणावरुन झालेल्या वादात पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून (Murder In Pune) केला. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गोमती भोपाली केवट (वय ४९) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police) तिचा पती मुरली चैनु केवट (वय ३६, रा. संदीप रोझ नर्सरी, सोरतापवाडी) याला अटक केली आहे. (Pune Crime)

 

याबाबत अमर काळुराम पांगारकर (वय ४७, रा. महादेवनगर, सोरतापवाडी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर पांगारकर यांचे सोरतापवाडी येथे संदिप रोझ नर्सरी आहे. या नर्सरीमध्ये गोमती व मुरली केवट हे काम करतात. नर्सरीच्या जवळच पत्र्याच्या शेडमध्ये ते रहात होते. मुरली हा गोमतीचा दुसरा पती आहे. तिच्या पहिल्या पतीपासून झालेली मुले मध्य प्रदेशात Madhya Pradesh (MP) असतात. येथील कामाचे पैसे ती या मुलांना पाठवत होती. त्यावरुन त्यांच्यामध्ये नेहमी भांडणे होत असत. रविवारी रात्री साडेदहा वाजता त्यांच्यात याच कारणावरुन वाद झाला. तेव्हा मुरली याने गोमती हिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. याची माहिती अमर पांगारकर यांना मिळाल्यावर त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी मुरली केवट याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड (PSI Sadashiv Gaikwad) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Loni Kalbhor Police Husband Murder Wife Pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime | येरवड्यात तडीपार गुंडाकडून घरात घुसून 21 वर्षीय तरूणीचा विनयभंग; पिडीतेच्या आईला अश्लिल भाषेत शिवीगाळ

Pune Crime | ‘अ‍ॅन्टी करप्शन’ अशी बतावणी करुन सराफाच्या कामगाराला 17 लाखाला लुटले; स्वारगेट येथील वेगा सेंटरजवळील घटना

LIC IPO च्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांनी लक्ष द्यावे, मे पर्यंत पुढे ढकलला जाऊ शकतो ‘पब्लिक इश्यू’

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक पेन ड्राईव्ह बॉम्ब; महाविकास आघाडी सरकारला आणखी एक झटका

 

Related Posts