IMPIMP

Pune Crime | ‘अ‍ॅन्टी करप्शन’ अशी बतावणी करुन सराफाच्या कामगाराला 17 लाखाला लुटले; स्वारगेट येथील वेगा सेंटरजवळील घटना

by nagesh
Pune Crime | incident of attack on a school boy by a goon in kothrud area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | नांदेडहून (Nanded) सोने खरेदी करण्यासाठी आलेल्या कामगाराला अ‍ॅन्टी करप्शन (Anti
Corruption) अशी बतावणी करुन चौघा जणांनी त्याच्याकडील १७ लाख ५८ हजार ७५० रुपये जबरदस्तीने लुटून नेले. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

ही घटना स्वारगेट येथील वेगा सेंटरजवळील (Vega Center Swargate) ट्रॅव्हल थांब्याजवळ फुटपाथवर ७ मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजता घडली.

 

याबाबत मधुरम सत्यनारायण सोनी Madhuram Satyanarayan Soni (वय २७, रा. गंगा सिटी, नांदेड) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी यांच्याकडील कर्मचारी शंकर भालेराव हे त्यांच्या सांगण्यावरुन सोने खरेदी करण्यासाठी नांदेडहून पुण्याला (Nanded To Pune) प्रवास करुन आले होते.
ट्रॅव्हल बसमधून ते स्वारगेटला आले होते. यावेळी एका काळ्या रंगाच्या कारमधून चौघे जण आले.
त्यांच्यातील एकाने शंकर यांच्या खाद्यावर हात टाकून “अ‍ॅन्टी करप्शन” अशी बतावणी करुन त्यांना पिस्टलसारख्या हत्याराचा धाक दाखवला (Pune Crime).
त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसविले. त्यानंतर त्यांच्या ताब्यातील १७ लाख ५८ हजार ७५० रुपयांची बॅग जबरदस्तीने चोरुन ते पळून गेले.
ही बाब शंकर यांनी सोनी यांना कळविली.
त्यानंतर त्यांनी पुण्यात येऊन फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक रसाळ (API Rasal) तपास करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Pretending to be anti corruption robbed a bullion worker of Rs 17 lakh Incident near Vega Center in Swargate

 

हे देखील वाचा :

LIC IPO च्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांनी लक्ष द्यावे, मे पर्यंत पुढे ढकलला जाऊ शकतो ‘पब्लिक इश्यू’

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक पेन ड्राईव्ह बॉम्ब; महाविकास आघाडी सरकारला आणखी एक झटका

The Kashmir Files | काय आहे डिमेंशिया, ज्याची ’द कश्मीर फाइल्स’ मध्ये ’पुष्कर पंडित’ यांना होती समस्या, जाणून घ्या 12 लक्षणे

 

Related Posts