IMPIMP

Pune Crime | महापालिकेत नोकरीच्या आमिषाने गंडा घालणार्‍याला सापळा रचून पकडले; पालिकेच्या सुरक्षा रक्षकांच्या दक्षतेने फसवणुकीचा प्रकार आला समोर

by nagesh
Pune Crime News | Fraud of youth on official toll free number of finance company; 7.5 lakhs cheated by asking to generate a new credit card PIN

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | बारामतीच्या (Baramati) परिसरातील तरुणांना पुणे महापालिकेत Pune Municipal Corporation (PMC) नोकरी लावण्याच्या आमिषाने (Lure Of Job) त्याने सर्वांना महापालिकेत बोलावले होते. त्यानुसार शुक्रवारी दुपारी ते महापालिकेत मुलाखतीला आले होते. पण, दरवाजाच्या सुरक्षा रक्षकाने काय काम आहे, याची विचारणा केली. तेव्हा आमचा इन्टरव्ह्यू असल्याने या तरुणांनी सांगितले. तेव्हा त्यांनी असा काही इन्टरव्ह्यू नसल्याने सांगितले. त्यावरुन काहीसा वाद झाला. तेव्हा लोकांना थेट महापालिकेतच मुलाखतीला बोलावून त्यांना गंडा (Cheating Case) घालण्यात येत असल्याचा महापालिका प्रशासनाच्या लक्षात आले. त्यांनी या तोतया शासकीय अधिकार्‍याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. (Pune Crime)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हिम्मतराव बाळासाहेब निंबाळकर Himmatrao Balasaheb Nimbalkar (वय ३४, रा. मंगरायाची वाडी, पेठ वडगाव – Peth Wadgaon, जि. कोल्हापूर – Kolhapur) असे अटक केलेल्या तोतयाचे नाव आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी बारामती येथील एका २७ वर्षाच्या तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२२/२२) दिली आहे. हा प्रकार बारामतीतील गिरीजा हॉस्पिटल, मुंबईतील मंत्रालय (Mumbai Mantralaya Area) परिसर व पुणे महापालिकेत ३१ जुलै ते शुक्रवारी १९ ऑगस्ट २०२२ दरम्यान घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिम्मतराव निंबाळकर याने आपण मंत्रालयात नोकरीला असल्याचे सांगितले.
त्यासाठी तो महाराष्ट्र शासन असे नाव असलेली लेस गळ्यामध्ये अडकवून फिरत असे.
३१ जुलै रोजी तो फिर्यादी यांना रेल्वे स्टेशन येथे स्टेशन क्लार्क म्हणून नोकरी लावतो, असे सांगितले होते.
त्यानंतर त्याने पुणे महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्याने फिर्यादी यांच्याकडून ऑनलाईन तसेच रोख स्वरुपात १ लाख रुपये घेतले.
तसेच त्यांच्या ओळखीच्या दोन तरुणी व ४ तरुणांनाही महापालिकेत नोकरी लावतो, असे सांगून त्यांच्याकडून ७ लाख ३० हजार रुपये घेतले.
त्यांना शुक्रवारी तुमचा महापालिकेत इन्टरव्ह्यू आहे असे सांगून पुणे महापालिकेत बोलविले होते.
त्यानुसार हे सर्व जण महापालिकेत आले असताना त्यांना दरवाजात सुरक्षा रक्षकांनी अडविले.
कोठे जायचे असे विचारल्यावर त्यांनी आज आमची मुलाखत असल्याचे सांगितले. सुरक्षा रक्षकांना संशय आल्याने त्यांनी प्रशासन विभागात कळविले.
त्यानंतर हा सर्व फसवणुकीचा प्रकार असल्याचे दिसून येत असल्याने त्यांनी हिम्मतराव निंबाळकर याच्याकडे विचारणा केली.
तेव्हा तो उडवा उडवीची उत्तरे देऊन पळून जाऊ लागला.
त्यामुळे महापालिका सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलीस उपनिरीक्षक अहिवळे तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : –  Pune Crime | Lure of a job in the Municipal Corporation, the scammer was caught in a trap The vigilance of the security guards of the municipality came to the forent

 

हे देखील वाचा :

Aditya Thackeray | दौऱ्यापूर्वीच जळगावमध्ये आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर फाडले; राजकारण तापलं

FIR On Manish Sisodia | मनीष सिसोदिया आरोपी नंबर 1, दिल्लीतील दारू घोटाळ्यात ‘हे’ आहेत 15 जण, जाणून घ्या आत्तापर्यंतच्या A To Z अपडेट्स

Pune Accident News | दुर्दैवी ! पुण्याच्या लोणीकाळभोरमध्ये कंटेनरच्या धडकेत सख्ख्या बहिणी जागीच ठार; मामासह दुचाकीवरून जात होत्या शाळेला

 

Related Posts