IMPIMP

Aditya Thackeray | दौऱ्यापूर्वीच जळगावमध्ये आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर फाडले; राजकारण तापलं

by nagesh
Aditya Thackeray | the banner welcoming yuva sena chief aditya thackeray was torn in jalgaon

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shiv Sena) झाल्यानंतर पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी आणि
कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे महाराष्ट्र दौरा (Maharashtra) करत आहेत. आदित्य
ठाकरे आज जळगाव (Jalgaon) दौऱ्यावर येत असून ते तीन ठिकाणी बंडखोरांच्या मतदारसंघात सभा घेणार आहेत. यामध्ये मंत्री गुलाबराव पाटील
(Minister Gulabrao Patil), आमदार किशोर पाटील (MLA Kishore Patil) आणि चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांच्या मतदारसंघाचा
समावेश आहे. मात्र, आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) जळगाव दौऱ्यापूर्वी राजकीय वातावरण तापल्याचे पहायला मिळत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

धरणगावामध्ये अज्ञात व्यक्तीने आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या स्वागताचे बॅनर फाडल्याची (Tore the Banner) घटना समोर आली आहे.
हे बॅनर फाडल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून यानंतर तणाव निर्माण झाला होता.
या घटनेमुळे संतप्त शिवसैनिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस ठाण्यातील (Dharangaon Police Station) पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.

 

मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील आणि चिमणराव पाटील या आमदारांची त्या त्या मतदरासंघात कट्टर शिवसैनिक (Shiv Sainik) ओळख असून त्याठिकाणी प्रत्येकाचा चांगला प्रभाव आहे.
त्यामुळे या बंडखोरांच्या मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण व्हावा.
तसंच या ठिकाणचे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला महत्व प्राप्त झाल्याचे पहायला मिळत आहे.

 

Web Title : – Aditya Thackeray | the banner welcoming yuva sena chief aditya thackeray was torn in jalgaon

 

हे देखील वाचा :

Pune Accident News | दुर्दैवी ! पुण्याच्या लोणीकाळभोरमध्ये कंटेनरच्या धडकेत सख्ख्या बहिणी जागीच ठार; मामासह दुचाकीवरून जात होत्या शाळेला

FIR On Manish Sisodia | मनीष सिसोदिया आरोपी नंबर 1, दिल्लीतील दारू घोटाळ्यात ‘हे’ आहेत 15 जण, जाणून घ्या आत्तापर्यंतच्या A To Z अपडेट्स

Pune Crime | दहीहंडी उत्सवात गोळीबार, कोयत्याने वार; सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक येथील घटना

 

Related Posts