IMPIMP

Pune Crime | खळबळजनक ! पुण्यात ‘कंडोम’वरुन झाली खूनाच्या गुन्ह्याची उकल; जाणून घ्या प्रकरण

by nagesh
Pune Crime | murder of a woman who refuses to have an affair the accused fled after throwing the body in the bathroom in lohegaon of vimannagar police station limits

पुणे / पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन गळा आवळून एकाचा खून करुन त्याच्याकडील 4 हजार रुपये काढून घेतल्याची घटना पुण्यातील (Pune Crime) पिंपरी-चिंचवड परिसरात घडली होती. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi police station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, घटनास्थळी निरोध (कंडोम) Condom मिळून आले होते. यावरुन निगडी पोलिसांनी गुन्ह्याची उकल करत दोन तृतीयपंथींना अटक केली. ही घटना (Pune Crime) पिंपरी चिंचवड मधील काळभोर नगर येथील प्रिमियर कंपनीच्या (Premier Company) जवळच्या मोकळ्या जागेत 1 नोव्हेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली होती.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

बसराज भिमप्पा इटकल Basraj Bhimappa Itkal (वय-38 रा. आनंदनगर, चिंचवड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अंजली बाळू जाधव Anjali Balu Jadhav (वय-25), अनिता शिवाजी माने Anita Shivaji Mane (वय-26 दोन्ही रा. थेरगाव) असे अटक केलेल्या तृतीयपंथींचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी येथील काळभोरनगर (Akurdi Kalbhornagar) येथे मोकळ्या जागेत एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मयताचा गळा आवळल्याचे व्रण होते. तसेच घटनास्थळी निरोधचे पाकिट व वापरलेले निरोध मिळून आले. यावरुन पोलिसांनी (pune crime) तपास सुरु केला.

 

गुन्ह्याचा तपास करत असताना या भागात देहविक्रीचा (Prostitution) व्यवसाय चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
अधिक तपास केला असता दोन तृतीयपंथी रात्रीच्या वेळी थांबत असल्याचे समोर आले.
त्यानंतर पोलिसांनी अंजली आणि अनिता या दोन तृतीयपंथींना ताब्यात घेतले.
आरोपींनी मयत इटकल याच्याकडे पैशांची मागणी केली.
मात्र, पैसे देण्यास नकार दिल्याने त्याचा गळा आवळून त्याच्या खिशातून 4 हजार रुपये काढून घेतल्याची (Pune Crime) कबुली आरोपींनी दिली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash), अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे (Addi CP Dr. Sanjay Shinde), पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मंचक इप्पर (DCP Manchak Ippar) , सहायक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे (ACP Dr. Sagar Kavade) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड (Senior Inspector of Police Ganesh Jawadwad), पोलीस निरीक्षक विश्वजीत खुळे (Police Inspector Vishwajeet Khule), सहायक निरीक्षक अमोल कोरडे (API Amol Korade), विजयकुमार धुमाळ (API Vijaykumar Dhumal), उपनिरीक्षक महेंद्र आहेर (PSI Mahendra Aher), विजय पवार (PSI Vijay Pawar), पोलीस कर्मचारी सतीश ढोले, सुधाकर आवताडे, शंकर बांगर, विनोद व्होनमाने, राहुल मिसाळ, विजय बोडके, भुपेंद्र चौधरी, तुषार गेंगजे, विलास केकाण, नितीन सपकाळ यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | murder solved because of Condom , 2 transgender arrested for murder for Rs 4,000

 

हे देखील वाचा :

Instagram ने दिले नवीन फीचर, आता कुणीही शेयर करू शकतो आपली स्टोरी

Pune Corona Vaccination | पुणेकरांनो… लस घेण्यासाठी जाताय? मग ही बातमी तुमच्यासाठीच

Pune News | अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथील जिमची निविदा प्रक्रिया तातडीने करा; नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांची मागणी

 

Related Posts