IMPIMP

Pune Crime | पुण्यातील उद्योजक गायकवाड बाप-लेकास तब्बल ‘एवढया’ दिवसांची पोलिस कोठडी

by nagesh
Pune Crime | criminal nanasaheb gaikwads locker full 1 crore gold and 50 lakh cash and other things come out

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | मोक्कानुसार दोनदा कारवाई झालेल्या औंध येथील उद्योजक नानासाहेब गायकवाड आणि त्याचा मुलगा गणेश यांना न्यायालयाने 27 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली (Pune Crime) आहे. मोक्का न्यायालयाने न्यायाधीश ए. एन. शिरशीकर (MCOCA Judge A. N. Shirshikar) यांनी हा आदेश दिला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पुणे पोलिसांनी (Pune Police) त्यांना बुधवारी रात्री कर्नाटक येथून अटक केली आहे.
त्यानंतर दोघांना आज येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.
नानासाहेब ऊर्फ भाऊ शंकरराव गायकवाड (Nanasaheb Gaikwad) आणि गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड Ganesh Gaikwad (सर्व रा.एनएसजी हाऊस, औंध) यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गणेश गायकवाड आणि नानासाहेब गायकवाड यांच्याविरूध्द सुनेच्या छळ केल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात (chaturshringi police station) गुन्हा दाखल आहे.

 

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात देखील गायकवाड बाप-लेकावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. खंडणी, जीवे मारण्याची धमकी, बेकायदा जमीन बळकाविणे, खासगी सावकारीसह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे देखील त्यांच्यावर दाखल आहेत.
नानासाहेब गायकवाड हा टोळीप्रमुख असून त्याने कुटुंबातील सदस्य व साथीदारांची संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून विविध गुन्हे केले आहेत.

नानासाहेब गायकवाड, त्याचा मुलगा व कुटुंबाविरुद्ध त्यांच्या सुनेने कौटुंबिक छळाचा गुन्हा
चतुःशृंगी पोलिस ठाण्यात (chaturshringi police station) दाखल केला होता.
त्यांच्या आमदार होण्यामध्ये सुनेचा अडथळा ठरत असल्याचे एका उच्चभ्रू आध्यात्मिक गुरूच्या सांगण्यावरून त्यांनी सुनेचा छळ करण्याबरोबरच तिच्यावर अघोरी विद्येचा प्रयोग केला होता.
या घटनेनंतर गायकवाड कुटुंबाविरुद्धच्या अनेक प्रकरणांना वाचा फुटली होती.

 

Web Title : Pune Crime | Nanasaheb Gaikwad and Ganesh Gaikwad from Aundh, has been remanded in police custody till August 27

 

हे देखील वाचा :

Anil Deshmukh | देशमुख पिता-पुत्रांनी ईडीला दाखवली पाठ, दाेघेही चौकशीसाठी गैरहजर

Gang Rape | नोकरी देण्याच्या बहाण्यानं धावत्या कारमध्ये 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

Nanded Traffic Police | मुसळधार पावसात बजावलं कर्तव्य, वाहतूक पोलिसाला मिळालं वरिष्ठांकडून ‘सरप्राईज’

Stock Market | ‘या’ IT स्टॉकमध्ये पैसे गुंतवून गुंतवणुकदार झाले मालामाल! वर्षभरात 5 लाख झाले 13.90 लाख रुपये; जाणून घ्या

 

Related Posts