IMPIMP

Pune Crime News | एकाच कुटुंबातील ७ जणांची आत्महत्या नाही तर हत्या; चार चुलत भावानींच खून करुन नदीत फेकले मृतदेह

by nagesh
Pune Crime News | 7 members of the same family are not suicides but murders; Four cousins were killed and the bodies thrown in the river

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | दौंड तालुक्यातील (Daund Taluka) पारगाव येथे भीमा नदीपात्रात (Bhima River) ६
दिवसांमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह (Dead Body) आढळले. या सात जणांनी सामुहिक आत्महत्या (Suicide) केल्याचे म्हटले जात
असतानाच आता त्याला वेगळे वळण मिळाले आहे. त्यांच्या ४ चुलत भावानींच त्यांचा खून (Murder In Pune) करुन मृतदेह नदीत फेकले असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे. याबाबतची अधिकृत माहिती दुपारनंतर जाहीर केली जाईल, असी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकीत गोयल (SP Ankit Goyal) यांनी दिली आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मोहन पवार हे यांच्या चुलत भावाने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
मोहन पवार यांचा मुलगाबरोबर असताना तीन ते चार महिन्यांपूर्वी चुलत भावाच्या मुलाचा अपघात झाला होता. तो मुलगा हॉस्पिटलमध्ये असतानाही मोहन पवार व त्यांच्या मुलाने ही बाब त्यांना सांगितली नाही. ४ दिवसानंतर मुलाच्या अपघाताची माहिती चुलत भावाला मिळाली. त्यानंतर त्या मुलाचा मृत्यु झाला होता. या घटनेचा राग मनात धरुन चार चुलत भावांनी या सर्वांची हत्या करुन त्यांचे मृतदेह नदीत फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी त्यांच्याकडे अधिक चौकशी करीत आहेत. (Pune Crime News)

 

Web Title :-  Pune Crime News | 7 members of the same family are not suicides but murders; Four cousins were killed and the bodies thrown in the river

 

हे देखील वाचा :

Uday Samant | राज्यातील एकही प्रकल्प आमच्यामुळे गेला नाही, ‘मात्र सत्ता गेल्यामुळे त्यांची….’ – उद्योगमंत्री उदय सामंत

Pune Crime News | पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला लोणी काळभोर पोलिसांकडून अटक

Pune Traffic News Updates | माघी श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत मोठे बदल; नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

 

Related Posts