IMPIMP

Uday Samant | राज्यातील एकही प्रकल्प आमच्यामुळे गेला नाही, ‘मात्र सत्ता गेल्यामुळे त्यांची….’ – उद्योगमंत्री उदय सामंत

by nagesh
New Information Technology Policy to be introduced in 15 days - Minister Uday Samant

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   राज्यातील एकही प्रकल्प आमच्यामुळे गेलेला नाही. मात्र सत्ता गेल्यामुळे काही लोकांची चिडचीड होत आहे. असा
टोला उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी ठाकरे गटाला (Shivsena Thackeray Group) लगावला. एका वृत्तवाहिनीने आयोजीत केलेल्या
कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी महाराष्ट्राचे उद्योगक्षेत्राविषयीचे व्हिजन देखील जाहीर केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले की, महाराष्ट्र ही उद्योगांची भूमी आहे. महाराष्ट्रासाठी उद्योगाचं व्हिजन एवढंच आहे की उद्योग विभागाचा जास्तीत
जास्त वापर करून महाराष्ट्रातल्या युवा पिढीला रोजगार उपलब्ध करून देणं. ज्या पद्धतीचं त्यांनी शिक्षण घेतलं आहे. त्या शिक्षणाला अनुरूप असा
रोजगार त्यांना मिळवून देणं.

 

तसेच यावर पुढे बोलताना उदय सामंत (Uday Samant) म्हणाले की, ‘माझ्या खात्याअंतर्गत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी फक्त ९० कोटी, १०० कोटी, १२० कोटींची अनुदानाची मर्यादा होती.
आमचं सरकार आल्यानंतर त्याची तरतूद ५५० कोटी रूपये आम्ही केलेली आहे.
जेणेकरून २५ हजार उद्योजक यावर्षी स्वत:च्या पायांवर उभे राहतील. त्या उद्योजकांकडे किमान दोन लोकं जरी
कामाला राहिली तर ५० हजार लोकांना आम्ही त्या एका योजनेतून रोजगार देऊ शकतो.
अशी संकल्पना देखील यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केली.

 

दरम्यान, याच वाहिनीकडून आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी महाविकास आघाडीवर (MVA) गंभीर आरोप केला होता.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्याविरोधात खोटे षडयंत्र रचण्यात येत होते.
त्याचाच भाग हे मुंबईचे तत्कालिन सीपी संजय पांडे (CP Sanjay Pande) देखील होते.
माझ्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याच्या तयारीत महाविकास आघाडीचे सरकार होते.’
असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर यावेळी बोलताना केला होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Uday Samant | some people may be angry after the power loss but no project has gone because of us uday samant

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला लोणी काळभोर पोलिसांकडून अटक

Pune CNG Pump | ग्रामीण भागातील सीएनजी पंपचालक संपावर; वाढीव कमिशन मिळत नसल्याने घेतला निर्णय

Pune Traffic News Updates | माघी श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत मोठे बदल; नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

 

Related Posts