IMPIMP

Pune Crime News | कोयते विक्रेत्यांवर ‘संक्रांत’ ! भोरी आळीतील दुकानदाराकडून 105 कोयते जप्त

by nagesh
Pune Crime News | Pune Police Crime Branch Seized Koyta Weapons Bhori Ali Faraskhana Police Station Limits

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime News | शहरात कोयत्याचा वापर करुन रस्त्यांवर दहशत माजविण्याचे, लुटालुट करण्याचे प्रकार वाढत असल्याने कोयता हे हत्यार कुप्रसिद्ध झाले आहे. गुन्हेगारांवर अटकाव करण्याचा भाग म्हणून आता पोलिसांनी कोयते विक्रेत्यांवर संक्रांत आणली आहे. भोरी आळीतील एका दुकानावर गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) पथकाने छापा घातला. दुकानातून नवीन विक्रीसाठी ठेवलेले १०५ कोयते जप्त केले.

 

आपल्या भागात भाईगिरी करण्यासाठी अनेक अल्पवयीन मुले, तरुण कोयत्याचा वापर करुन दहशत निर्माण करीत आहेत. भर रस्त्यावर गर्दीच्या वेळी कोयत्याने येणार्‍या जाणार्‍यांवर वार करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. दुकानदारांना कोयत्याचा धाक दाखवून खंडणी मागण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर समोर येऊ लागले आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये कोयता हे प्रमुख हत्यार म्हणून वापर होताना दिसते. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत पुण्यातील कोयत्या गँगचा विषय उपस्थित केला होता. त्यानंतर पोलिसांनी या गुन्हेगारांवर कारवाईची मोहिम हाती घेतली.
त्याचाच एक भाग म्हणून गुन्हेगारांच्या हाती कोयते लागू नये,
म्हणून त्याची विक्री करणार्‍या दुकानावर छापा टाकून १०५ कोयते जप्त करण्यात आले आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Pune Police Crime Branch Seized Koyta Weapons Bhori Ali Faraskhana Police Station Limits

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | शिंदे-फडणवीस सरकारमधील भ्रष्टचाराचा आरोप झालेल्या मंत्र्यांवर सामनातून जहरी टीका…

Prabhakar Bhave Passed Away | ज्येष्ठ रंगभूषाकार काळाच्या पडद्याआड ! पुण्यातील कलावंतांच्या चेहर्‍याला सर्वप्रथम रंग लावणारे प्रभाकर भावे यांचे निधन

Amruta Fadnavis | अमृता फडणवीसांचे उर्फी जावेदबद्दल मोठे विधान; म्हणाल्या – ‘उर्फी जे करतेय, त्यात काहीच वावगं नाही’

 

Related Posts