IMPIMP

Pune Crime | दुसरीकडे पानटपरी लावल्याने जातीवाचक शिवीगाळ करणार्‍यांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

by nagesh
 Pune Crime News | A case has been filed against the moneylender who demanded 55 thousand even after returning 2.5 lakh on 50 thousand, FIR in Chandannagar police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | कोरोना काळात भाडे थकल्याने जागा खाली करायला लावल्याने व्यावसायिकाने दुसरीकडे पान टपरी लावली. या कारणावरुन शिवीगाळ करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याने शिवाजीनगर पोलिसांनी (Pune Police) तिघांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार (Atrocities Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ज्ञानेश्वर अनंतराव ढमढेरे (Dnyaneshwar Anantrao Dhamdhere), संतोष पवार (Santosh Pawar) आणि ज्ञानेश्वर यांचा ड्रायव्हर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

 

याप्रकरणी भुगाव येथे राहणार्‍या एका ५४ वर्षाच्या व्यावसायिकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १६१/२२) दिली आहे. हा प्रकार कोर्ट गेट नं ४ च्या समोरील सागर झेरॉक्सचे बाजूला ६ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी साडेदहा वाजता घडला होता. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पान टपरीचा व्यवसाय असून ज्ञानेश्वर ढमढेरे यांच्या
फास्ट फुडचे समोरील फुटपाथवर फिर्यादीची टपरी आहे. फिर्यादी व ढमढेरे यांच्यात वेळोवेही ठरल्याप्रमाणे २०१९
पासून ते आरोपीला ५ हजार रुपये महिना भाडे देत होते. परंतु कोरोना प्रादुर्भावामुळे फिर्यादी यांनी भाडे दिले नव्हते.
तेव्हा आरोपीने थकीत ५० हजार रुपये देण्यासाठी तगादा लावला. फिर्यादीला जागा खाली करण्यास लावली.
फिर्यादी यांनी जवळच दुसर्‍या जागेत पानटपरी चालू केली.
तेव्हा आरोपी त्यांच्याकडे आले व त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करुन जातीवाचक बोलून खालच्या जातीच्याला धरा असे म्हणून मारहाण केली. याबाबत त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
परंतु, पोलिसांनी फिर्याद दाखल न केल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस आयुक्त माने
(Assistant Commissioner of Police Mane) अधिक तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Pune Crime | On the other hand, a case of atrocity has been filed against those who used pantapari for caste abuse

 

हे देखील वाचा :

Rain in Maharashtra | दिवाळीवर पावसाचे सावट; परतीचा पाऊस लांबला

Pune Crime | दिवाळीच्या स्टॉलसाठी फिडरमधुन वीज घेण्याचा प्रयत्न करताना तरुणाचा मृत्यू

Sujit Patwardhan Passed Away | परिसर संस्थेचे सुजित पटवर्धन यांचे निधन

 

Related Posts