IMPIMP

Sujit Patwardhan Passed Away | परिसर संस्थेचे सुजित पटवर्धन यांचे निधन

by nagesh
Sujit Patwardhan Passed Away

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Sujit Patwardhan Passed Away | पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि परिसर संस्थेचे संस्थापक सुजित पटवर्धन यांचे शनिवारी पहाटे निधन (Sujit Patwardhan Passed Away) झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सुजित पटवर्धन गेले काही दिवस आजारी असल्याने त्यांना दोन दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना शनिवारी पहाटे त्यांचे निधन झाले.

 

सुजित पटवर्धन हे व्यवसायाने प्रिंटर होते. इंग्लंडमध्ये प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा अभ्यास करुन ते पुण्यात परतले. नारायण पेठेत त्यांनी मुद्रा ही प्रिंटिंग प्रेस स्थापन करुन त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला होता.

 

पुणे शहर व पिंपरी चिंचवड मधील सार्वजनिक वाहतूक सक्षम व्हावी, यासाठी ते गेली २ दशक प्रयत्नशील होते.
सायकल ट्रॅक, बीआरटी, पदपथ, नदी सुधार या विषयावर त्यांनी काम केले.
शहरातील पर्यावरणाचा समतोल राखला जावा, यासाठी त्यांनी १९८० मध्ये परिसर संस्थेची स्थापना केली.
खासगी वाहनांच्या संख्येवर नियंत्रण राखण्यासाठी आणि शहरातील हवा प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांनी
महापालिकेकडे पार्किंग धोरण आखण्याची सातत्याने मागणी करुन पाठपुरावा केला होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Sujit Patwardhan Passed Away

 

हे देखील वाचा :

Health Department Recruitment | तरुणांना नोकरीची संधी, आरोग्य विभागातील 10 हजार पदांसाठी भरती करण्याची राज्य सरकारची घोषणा

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले – ‘आव्हान अंगावर घेण्याची वेळ आली की नेहमी मलाच…’

Parbhani News | परभणीत महिलाराज ! जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, महानगरपालिकेच्या आयुक्त आणि जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पदांवर महिला

 

Related Posts