IMPIMP

Pune Crime | दिवाळीच्या स्टॉलसाठी फिडरमधुन वीज घेण्याचा प्रयत्न करताना तरुणाचा मृत्यू

by nagesh
Pune Crime News | Kothrud Police Station: One killed, another critically injured due to electrocution from high voltage power line

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | दिवाळीचा स्टॉल लावताना त्यासाठी अनधिकृतपणे हायटेंशन वीज पुरवठा केला जाणार्‍या फिडर पिलरमधून (Feeder Pillar) वीज घेण्याचा प्रयत्न करताना एका तरुणाचा वीजेचा धक्का (Electric Shock) बसून मृत्यू झाला. (Pune Crime)

प्रविण अशोक माने Pravin Ashok Mane (वय ३८, रा. गणेशखिंड रोड, औंध) असे मृत्यु पावलेल्याचे नाव आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी सहायक अभियंता मनोज प्रभाकर नेमाडे (Assistant Engineer Manoj Prabhakar Nemade) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४५९/२२) दिली आहे. त्यानुसार प्रविण माने आणि शांताबाई पांडुरंग खंदारे Shantabai Pandurang Khandare (वय ३२) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार औंध येथील स्टार बक्स कॉफी शॉपचे समोरील आय टी आय रोडशेजारील फुटपाथवर ११ के व्ही फिडर पिलरमध्ये १९ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताबाई खंदारे यांचे दिवाळी स्टॉल फुटपाथवर आहे.
तेथे जवळच घरगुती वीजपुरवठा करणारे लो टेंशन फिडर व ११ के व्ही फिडर पिलर शेजारी शेजारी आहे. प्रविण माने यांनी हाय टेन्शन फिडर पिलरचा दरवाजा अनधिकृतपणे उघडून विद्युत वाहिनीमधून वीज चोरी करण्याच्या उद्देशाने विद्युत वाहिनीला छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना जोरात वीजेचा धक्का बसून ते जखमी झाले. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यु झाला. सहायक पोलीस निरीक्षक झरेकर (Assistant Police Inspector Zarekar) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Youth dies while trying to get electricity from feeder for Diwali stall

 

हे देखील वाचा :

Sujit Patwardhan Passed Away | परिसर संस्थेचे सुजित पटवर्धन यांचे निधन

Health Department Recruitment | तरुणांना नोकरीची संधी, आरोग्य विभागातील 10 हजार पदांसाठी भरती करण्याची राज्य सरकारची घोषणा

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले – ‘आव्हान अंगावर घेण्याची वेळ आली की नेहमी मलाच…’

 

Related Posts