IMPIMP

Pune Crime | पुण्यात घोड्यांच्या शर्यतीवर बेटिंग घेणार्‍यांवर छापा; हडपसर परिसरातील सय्यदनगरमधील प्रकार उघडकीस

by nagesh
Pune Crime | Criminals robbed the couple in the Bopadev ghat, attacked them with a sword and looted their mobile and Mangalsutra

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | घोड्याच्या शर्यतीवर बेटिंग (Online Betting On Horse Racing) घेण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला असून वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. आतम अशोक बजाज Atam Ashok Bajaj (वय ४५, रा. लुल्लानगर – Lulla Nagar) आणि फिरोज रशिद पठाण Feroz Rashid Pathan (वय ३२ रा. हडपसर – Hadapsar) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी पोलीस अंमलदार निळकंठ राठोड यांनी वानवडी पोलीस ठाण्यात Wanwadi Police Station (गु. रजि. नं. १४४/२२) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील सय्यदनगर (Sayyed Nagar, Pune) येथे घोड्यांच्या शर्यतीवर बेटिंग घेतले जात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी अगोदर खात्री केली. त्यानंतर रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सय्यदनगर येथील घरावर छापा घातला. यावेळी तेथे बजाज व पठाण हे घोड्याच्या शर्यतीवर मोबाईलद्वारे ऑनलाइृन सट्टा लावत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून मोबाईल व जुगारीचे साहित्य (Gambling Materials) असा १७ हजार ४३९ रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांना नोटीस बजावून सोडण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title : Pune Crime | Online Betting On Horse racing In Sayyadnagar And Hadapsar Area Of Pune FIR On Atam Ashok Bajaj And Feroz Rashid Pathan

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | खुशखबर ! चांदीच्या दरात 1000 रूपयांची घसरण, जाणून घ्या आजचे सोन्याचे दर

CM Uddhav Thackeray | ‘बिनकामाचे भोंगे वाजवणाऱ्यांना काडीचीही किंमत देत नाही’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Sharad Pawar On Amruta Fadnavis | मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेवरून पवारांनी अमृता फडणवीसांना फटकारलं; म्हणाले…

 

Related Posts