IMPIMP

Pune Crime | ‘गणेश पेठेचा भाई आहे’ म्हणत तडीपार गुन्हेगाराचा ‘राडा’; भर रस्त्यात महिलेचा विनयभंग करुन पसरविली दहशत

by nagesh
Pune Crime News | Yerwada Police Arrest Tadipaar Criminal

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पोलिसांच्या रेकॉर्डवरील व तडीपार गुन्हेगाराने (Pune Criminals) ‘मी गणेश पेठेचा भाई आहे, मला पोलिसांची भिती दाखवू नका नाही तर एकेएकाला कोयत्याने खल्लास करुन टाकील’, अशी धमकी देत भर रस्त्यात महिलेचा विनयभंग (Molestation Case) केला. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

संदीप कमलाकर चव्हाण Sandeep Kamlakar Chavan (वय ४२, रा. गणेश पेठ) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. हा प्रकार गणेश पेठेतील (Ganesh Pethe) सादडी सदनजवळ सोमवारी रात्री आठ वाजता घडला. याप्रकरणी एका ४६ वर्षाच्या महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे सासरे हे त्यांच्या दुकानाच्या ओट्यावर बसले होते. त्यावेळी फिर्यादी यांच्या सासर्‍यांनी पोलिसांकडे (Pune Police) तक्रार केली, अशी समजूत करुन घेऊन संदीप चव्हाण याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी फिर्यादी यांनी विचारले असताना त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्याला समजाविण्यास फिर्यादी यांची चुलत सासू गेली असताना त्यांना कोयत्याने धमकाविले. कोयता हवेत फिरवून ‘मी गणेश पेठेचा भाई आहे. मला पोलिसांची भिती दाखवू नका, नाही तर एकएकाला कोयत्याने खल्लास करुन टाकीन’, असे मोठमोठ्याने ओरडून दहशत पसरविली. त्यामुळे आजू बाजूचे लोक व मुले पळून गेली. (Pune Crime)

 

संदीप चव्हाण याला परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्तांनी यापूर्वी तडीपार केले होते.
सहायक पोलीस निरीक्षक शेटे (API Shete) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Panic spread by molesting a woman in the street of ganesh peth

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात थोडीशी घसरण; जाणून घ्या आजचा भाव

Bappi Lahiri Passes Away | ‘गोल्डमॅन’ बप्पी लाहिरी यांचे 70 व्या वर्षी निधन

Ind Vs SL New Schedule | लखनऊमध्ये होणार भारत-श्रीलंकेचा पहिला टी-20 सामना, BCCI ने जारी केले नवीन वेळापत्रक

Post Office Investment Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणुकीवर दुप्पट होतील पैसे, बुडण्याची सुद्धा भीती नाही; जाणून घ्या सविस्तर

DCP Sagar Patil | लहान मुले व महिलांसाठी काम करणाऱ्या स्वंयसेवी संस्थानी एकत्रित यावे – पोलीस उपायुक्त सागर पाटील

 

Related Posts