IMPIMP

Pune Crime | पुणे पोलिसांकडून राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक ! टीईटी पेपर फुटीसाठी मदत केल्याचा ठपका

by nagesh
mahatet-exam-scam-case-another-rs-33-lakh-was-recovered-tukaram-supes-house-and-offices

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | टीईटी परीक्षा TET Exam (Teacher Eligibility Test Exam) पेपर फुटल्याचे सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) केलेल्या तपासात निष्पन्न झाले असून सायबर पोलिसांनी पेपट फुटीला (Paper Leak) मदत केल्याप्रकरणी राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Maharashtra State Examination Council Commissioner Tukaram Supe) यांना अटक (Pune Crime) केली आहे. याबाबत आज दुपारी 1 वाजता पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती देणार आहेत. पेपर फुटीच्या प्रकरणात स्वतः पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे तपास पथकास मार्गदर्शन करत आहेत.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

म्हाडा परीक्षेचा पेपर (Mhada Exam Paper Leak) फुटताना जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा (GA software technologies pvt ltd) डॉ. प्रीतीश देशमुख (Dr. pritesh Dilip Deshmukh) याच्या घरझडतीत TET च्या परीक्षार्थींचे हॉल तिकीट सापडले होते. त्याचवेळी टीईटीचा पेपर फुटल्याचे निश्चित झाले होते.
त्यानंतर गुरुवारी सायबर पोलिसांनी राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना पिंपरीतील (Pimpri Chinchwad) त्यांच्या घरातून ताब्यात घेतले होते.
त्यांच्याकडे दिवसभर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात (Pune Crime) आली आहे.

 

यामुळे आरोग्य विभागाबरोबरच (Maharashtra Health Department Exam)
आता शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फोडण्यात त्याच खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांचा हात असल्याचे दिसून आले आहे.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police arrested maharashtra state examination council commissioner tukaram supe in tet exam paper leak case

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील 21 वर्षीय तरूणीला लग्नाच्या आमिषाने भूगाव येथील लॉजवर नेलं, बलात्काराच्या काही दिवसांनंतर केला ‘गर्भपात’

LIC Alert | एलआयसीनं ग्राहकांना केलं सतर्क ! Logo पाहून ठेवू नका विश्वास, अन्यथा होईल मोठे नुकसान; जाणून घ्या

शशी थरूर यांनी मिस Miss Universe Harnaaz Sandhu सोबत फोटो पोस्ट करून दिल्या शुभेच्छा, परंतु पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

 

Related Posts