IMPIMP

Pune Crime | निलेश घायवळ टोळीचा सदस्य आणि गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या रोहित आखाडे व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 92 वी कारवाई

by nagesh
Pune Crime | Pune Police Commissioner Amitabh Guptas 92nd MCOCA action till date against Criminals Nilesh Ghaiwal gang member and gang leader Rohit Akhade and his gang booked under mokka

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुण्यातील कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळ टोळीतील (Nilesh Ghaiwal Gang) सदस्य आणि सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा म्होरक्या रोहित विठ्ठल आखाडे (Rohit Vitthal Akhade) व त्याच्या टोळीतील 3 सदस्यांवर पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी मोक्का अंतर्गत कारवाई (MCOCA Action) Mokka केली आहे. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून 60 लाख रुपये खंडणी (Extortion) मागितल्याचा गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) दाखल आहे. आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आजपर्यंत 92 आणि चालु वर्षात 29 टोळ्यांवर मोक्का कारवाई (Pune Crime) केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

टोळी प्रमुख रोहित विठ्ठल आखाडे (वय – 26 रा. शास्त्रीनगर, कोथरुड), आकाश सुरेश कंधारे (वय – 23 रा मु पो. चिंचवडे, बेलावडे, ता. मुळशी), संकेत कैलास धाईंजे (वय – 26 रा. सेनापती बापट रोड, गोखलेनगर, पुणे) यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक (Arrest) केली असून त्यांचा साथिदार सुरज कुऱ्हाडे (रा. पुणे) हा फरार आहे. या सर्वांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे.

 

आरोपी हे कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीमधील सदस्य असून त्यांनी स्वत:च्या व टोळीच्या वर्चस्वा करीता खुनाचा प्रयत्न करणे (Attempted Murder), जबरदस्तीने खंडणी मागणे, दहशत माजवणे, पिस्तुल बाळगणे, गर्दी जमवून मारामारी करणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. या टोळीविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र त्यांच्यामध्ये काहीच सुधारणा झाली नाही. (Pune Crime)

 

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फिर्यादी यांना आरोपींनी कोंढावळे बेलावडे भागात विक्रीकरीता शेतजमीन दाखवण्याच्या बहाण्याने शिवाजीनगर येथून घेऊन गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना कोणतीही शेतजमीन न दाखवता टोळी प्रमुख रोहित आखाडे याने त्यांच्या डोक्याला पिस्टल (Pistol) लावली. तसेच तुला जिवे मारण्याची सुपारी दिली असल्याचे सांगितले. तुझा जीव जर वाचवायचा असेल तर आम्हाला 60 लाख रुपये दे, अशी धमकी (Threats to Kill) दिली. फिर्यादी यांनी जिवाच्या भितीने पैसे देण्याचे मान्य करुन सुटका करुन घेतली. त्यापूर्वी आरोपींनी त्यांच्याकडून 50 हजार रुपये खंडणी घेतली. फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आयपीसी 384, 385, 386, 387, 34 आर्म अ‍ॅक्ट (Arm Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचा प्रस्ताव गुन्हे शाखा युनिट सहाचे (Crime Branch Unit 6) वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने (Senior Police Inspector Ganesh Mane)
यांनी पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge)
यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale) यांच्याकडे प्रस्ताव सादर केला.
या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मंजूरी दिल्याने आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) करीत आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे,
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने,
सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील (API Narendra Patil),
पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील (PSI Narendra Patil),
पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, शंकर पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, पुजारी, खेडकर, मेमाणे,
सकटे, कारखेले, लाहिगुडे, ताकवणे, पवार, काटे, टिळेकर, घाडगे, तांबेकर, काळे यांनी केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Commissioner Amitabh Guptas 92nd MCOCA action till date against Criminals Nilesh Ghaiwal gang member and gang leader Rohit Akhade and his gang booked under mokka

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ग्राहकांवरुन ताडपत्री व्यावसायिकांमध्ये हाणामारी; टोळक्याने तलवारीने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न, फरासखाना पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Crime | लिफ्टमध्येच घेतला कुत्र्याने चावा; मालकिणीविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

White Tea For Weight Loss | ‘हा’ चहा पिल्याने हमखास कमी होईल वजन, चेहर्‍यावरील सुरकुत्या सुद्धा होतील गायब

 

Related Posts