IMPIMP

Pune Crime | दरमहा 10 टक्के व्याज उकळणारा खासगी सावकार गुन्हे शाखेकडून गजाआड

by nagesh
Pune Crime News | Accused who threatened to kill family of chartered accountant and demanded extortion of 30 lakhs arrested by crime branch

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | दरमहा 10 टक्के व्याज वसुल केल्यानंतरही आणखी पैशांची मागणी करुन धमकाविणाऱ्या खासगी सावकाराला गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक दोनने (Anti Extortion Cell) बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. रमजान मोहंमद खान Ramzan Mohammad Khan (वय 40, रा. शेलार चाळ, येरवडा) असे या सावकाराचे (Pune Crime) नाव आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

याप्रकरणी विनोद सिद्राम बुधाराम Vinod Sidram Budharam (वय 43, रा. विडी कामगार वसाहत, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रमजान शेख याच्यावर आयपीसी 385, 504 व महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत (Maharashtra Lenders Act) गुन्हा (FIR) दाखल दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद बुधाराम यांनी रमजान खान याच्याकडून ऑगस्ट 2021 मध्ये 50 हजार रुपये व डिसेंबरमध्ये 1 लाख रुपये असे मिळून 1 लाख 50 हजार रुपये दरमहा 10 टक्के व्याजाने (Interest) घेतले होते. त्याच्या बदल्यात त्यांनी मुद्दल व व्याज मिळून एप्रिल 2022 पर्यंत एकूण 2 लाख 12 हजार 250 रुपये परत केले. असे असतानाही फिर्यादी यांना त्याने फोन करुन शिवीगाळ केली. त्यांच्याकडे 10 हजार 400 रुपयांची मागणी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik),
पोलीस उपायुक्त (आर्थिक व सायबर) भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navatke) अतिरिक्त कार्यभार अपर पोलीस आयुक्त,
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक- 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare),
पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan), पोलीस अंमलदार विजय गुरव, शैलेश सुर्वे,
प्रदिप शितोळे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, अनिल मेंगडे, अमोल पिलाने, सचिन अहिवळे, सैदाबा भोजराव,
चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, किशोर बर्गे, रवि संकपाळ, रुपाली कर्णवर, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Private moneylender of Yerwada Area, who charge 10 per cent interest per month

 

हे देखील वाचा :

NEET PG 2021 | जागा रिक्त ठेवून काय मिळणार, डॉक्टरांची गरज आहे ! वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 1456 जागा रिकाम्या असल्याने SC ची तीव्र टिप्पणी

Pune Crime | नदीकिनारी विहीरीसाठी सुरुंग स्फोट केल्याने दगड उडून घरांचे नुकसान; खराडीमधील घटनेत पाण्याची टाकी फुटली, दगड लागून काही जण जखमी

Maharashtra MLC Elections 2022 | ‘पंकजा मुंडेंच्या उमेदवारीसाठी देवेंद्र फडणवीस आणि आम्ही खूप प्रयत्न केले, पण..’ – चंद्रकांत पाटील

 

Related Posts