IMPIMP

Maharashtra MLC Elections 2022 | ‘पंकजा मुंडेंच्या उमेदवारीसाठी देवेंद्र फडणवीस आणि आम्ही खूप प्रयत्न केले, पण..’ – चंद्रकांत पाटील

by nagesh
Chandrakant Patil | 'People's sufferings are not understood by sitting on Matoshree' - Chandrakant Patil

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Maharashtra MLC Elections 2022 | राज्यसभेनंतर विधान परिषदेच्या (Maharashtra MLC Elections 2022) उमेदवारीवरून राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. आज भाजपने (BJP) विधान परिषदेसाठी पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar), भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad), उमा खापरे (Uma Khapre), श्रीकांत भारतीय (Srikant Bharatiya), राम शिंदे (Ram Shinde) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना डावलण्यात आलं आहे. पंकजा यांच्या उमेदवारीवरून विचारता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

चंद्रकांत पाटील म्हणाले, “आमच्या पार्टीमध्ये आम्ही सगळी कोरी पाकीटं असतो. जो पत्ता लिहील तो जात असतो. त्यामुळे राजकारणात काम करणारी व्यक्ती आणि त्याच्या चाहत्यांनी इच्छा व्यक्त करायची असते. पण निर्णय हा संघटना करते. विधानपरिषद, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा हे निर्णय केंद्र सरकार (Central Government) घेते. केंद्राने घेतलेला निर्णय हा सर्वांनी शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून मान्य करायचा असतो. पंकजा ताईंची उमेदवारी व्हावी, यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले. पण केंद्राने काहीतरी भविष्यातील विचार केला असेल.” (Maharashtra MLC Elections 2022)

 

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “पंकजा मुंडे या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत.
जिवंत माणूस म्हणून इच्छा व्यक्त करणे, अपेक्षा व्यक्त करणे आणि इच्छित गोष्ट न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात काहीही गैर नाही.
पण, भाजपमधील नाराजी ही, पाण्यातील एखादं जहाज क्रेनने उचललं तर पाण्यात पडणारा जो खड्डा असतो,
तसाच लगेच भरला जाणारा असतो. त्यामुळे नाराजी ही तात्कालिक असते,” असं ते म्हणाले.

 

Web Title :- Maharashtra MLC Elections 2022 | bjp leader chandrakant patil on bjp denied vidhanparishad election 2022 cadidature to pankaja munde

 

हे देखील वाचा :

Pune Crime | नदीकिनारी विहीरीसाठी सुरुंग स्फोट केल्याने दगड उडून घरांचे नुकसान; खराडीमधील घटनेत पाण्याची टाकी फुटली, दगड लागून काही जण जखमी

Pune Crime | एक्सगर्लफ्रेंडचा मोबाईल चोरुन त्यावरुन अश्लिल फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी

Pune Crime | दरमहा 10 टक्के व्याज उकळूनही धमकावणारा सावकार अटकेत

 

Related Posts