IMPIMP

Pune Crime | पुण्याच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई ! नायजेरियन दाम्पत्याकडून 1.31 कोटीचे कोकेन, एम.डी जप्त

by nagesh
pune-crime-pune-police-crime-branchs-big-action-cocaine-worth-1-31-crore-seized-from-nigerian-couple-m-d

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक एकने (Anti
Narcotics Cell, Pune) मोठी कारवाई केली आहे. बाणेर परिसरात राहणाऱ्या नायजेरियन दाम्पत्याच्या (Nigerian Couple) घरावर छापा टाकून
तब्बल 1 कोटी 31 लाख रुपये किमतीचे कोकेन (Cocaine), एम.डी. (M.D.) आणि इतर साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई आज (दि. 26) बाणेर
येथील नालंदा गार्डन रेसिडेंसी (Nalanda Garden Residency Baner) येथे करण्यात आली आहे. पोलिसांनी (Pune Police) नायजेरियन पती
-पत्नीला अटक केली आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

उगुचुक इम्यॅन्युअल IYI Ugochukwu Emmanuel (वय-43), ऐनीबेली ओमामा व्हिवान Enebeli Omamma Vivian (वय-30 रा. नालंदा गार्डन रेसीडन्सी, सी विंग, प्लॅट नं. 13 बाणेर मुळ रा. नायजेरिया) असे अटक करण्यात आलेल्या नायजेरियन दाम्पत्याचे नाव आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर (API Shailaja Jankar) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध एन.डी.पी.एस अॅक्ट (NDPS Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पोलीस अंमलदार यांना माहिती मिळाली की, बाणेर येथील नालंदा गार्डन रेसीडन्सी येथे राहणाऱ्या नायजेरियन दाम्पत्याने घरामध्ये कोकोने, एम.डी असे अंमली पदार्थाचा मोठ्या प्रमाणात साठा करुन ठेवला आहे. पथकाने मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकला. पोलिसांनी घरामध्ये बेकायदेशीररित्या विक्रीसाठी साठवलेले  96 लाख 60 हजार रुपये किमतीचे 644 ग्रॅम एम.डी (मेफेड्रोन Mephedrone) व 30 लाख 16 हजार 800 रुपये किमतीचे 201 ग्रॅम 120 मिलीग्रॅम कोकेन जप्त केले. तसेच रोख 2 लाख 16 हजार, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वजन काटा  असा एकूण 1 कोटी 31 लाख 8 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Senior Police Inspector Vinayak Gaikwad), सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dhengale), शैलजा जानकर, पोलीस अंमलदार मारुती पारधी, मनोज साळुंके, राहुल जोशी, पांडुरंग पवार, विशाल दळवी, संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, रेहना शेख, संदेश काकडे, नितेश जाधव, योगेश मोहिते यांच्या पथकाने केली.

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाराला शिंदे सरकारची स्थगिती; अजित पवारांच्या गंभीर आरोपानंतर फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलं, म्हणाले…

Pune NCP | कोणी पालकमंत्री देता का….? ……पालकमंत्री …..?, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Nude Photo Shoot | Ranveer Singh वर FIR, चार कलमांखाली केस दाखल, जेलमध्ये होऊ शकते रवानगी

 

Related Posts