IMPIMP

Nude Photo Shoot | Ranveer Singh वर FIR, चार कलमांखाली केस दाखल, जेलमध्ये होऊ शकते रवानगी

by nagesh
Nude Photo Shoot | ranveer singh nude photo shoot controversy mumbai fir ipc section 292 293 509 it act 67a

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाNude Photo Shoot | न्यूड फोटोशूट केल्याने रणवीर सिंग अडकत चालला आहे. त्याच्याविरुद्ध मुंबईतील चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Nude Photo Shoot). चेंबूरचे रहिवासी ललित टेकचंदानी यांनी हा एफआयआर दाखल केला आहे (Ranveer Singh Nude Photoshoot).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रणवीरवर महिलांच्या भावना दुखावल्याचा आणि प्रतिमेला हानी पोहोचवल्याचा आरोप आहे. भारतीय दंड विधान (IPC) च्या कलम 292, 293, 509 आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या कलम 67 (A) अंतर्गत रणवीरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

रणवीरवर ज्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्या अंतर्गत त्याला 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. त्याच्याविरुद्ध आयटी कायद्याच्या कलम 67 (A) अन्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, जो अजामीनपात्र आहे. (Nude Photo Shoot)

 

1. IPC चे कलम 292

तरतूद :
यामध्ये अश्लीलतेची व्याख्या करण्यात आली आहे. या अंतर्गत, कोणतेही पुस्तक, पेपर, पत्रक, मासिक, लेख, चित्र किंवा अशी कोणतीही गोष्ट अश्लील मानली गेली, जी कामुक आहे किंवा कामुक बनवणारी आहे किंवा जी पाहून, ऐकून किंवा वाचून लोक भ्रष्ट होऊ शकतात.

किती शिक्षा :
प्रथमच दोषी आढळल्यास 2 वर्षे कारावास आणि 2 हजार रुपये दंड. दुसर्‍यांदा दोषी आढळल्यास, त्याला पाच वर्षांपर्यंतच्या कारावासाची आणि पाच हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. हा जामीनपात्र गुन्हा आहे.

 

2. IPC चे कलम 293

तरतूद :
जर कोणतीही व्यक्ती 20 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीला असे अश्लील साहित्य विकत असेल किंवा दाखवत असेल किंवा प्रदर्शित करत असेल किंवा वितरित करण्याचा प्रयत्न करत असेल, तर या कलमाखाली गुन्हा नोंदवला जातो.

किती शिक्षा :
प्रथमच दोषी आढळल्यास 3 वर्षांचा कारावास आणि 2 हजार रुपये दंड. दुसर्‍यांदा दोषी आढळल्यास त्याला 7 वर्षांपर्यंत कारावास आणि 5,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. हा देखील जामीनपात्र गुन्हा आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

3. IPC चे कलम 509

तरतूद :
जर एखादा व्यक्ती स्त्रीच्या लज्जेचा अपमान करण्याच्या हेतूने बोलला किंवा आवाज काढला किंवा शरीराला स्पर्श केला किंवा स्त्रीच्या प्रतिष्ठेचा अपमान करणारी कोणतीही वस्तू दाखवली, तर या कलमाखाली गुन्हा नोंदवला जातो.

किती शिक्षा :
या कलमाखाली दोषी आढळल्यास त्याला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. तसेच दंड आकारला जाऊ शकतो. हा देखील जामीनपात्र गुन्हा आहे.

 

4. IT कायद्याचे कलम 67 (A)

तरतूद :
जर एखाद्या व्यक्तीने इलेक्ट्रॉनिक माध्यमातून असे कोणतेही साहित्य प्रकाशित केले, जे लैंगिक आहे, तर हे कलम लागू केले जाते.
या विभागात लैंगिक कृत्ये असलेली सामग्री प्रकाशित किंवा प्रसारित करण्यासाठी शिक्षेची तरतूद आहे.

किती शिक्षा :
हा अजामीनपात्र गुन्हा आहे. या अंतर्गत प्रथमच दोषी आढळल्यास त्याला 5 वर्षे तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
तर दुसर्‍यांदा दोषी आढळल्यास त्याला 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

 

जामीनपात्र आणि अजामीनपात्र यात फरक ?

कोड ऑफ क्रिमिनल प्रोसीजर म्हणजेच फौजदारी प्रक्रिया संहितेत, गुन्ह्यांची ‘जामीनपात्र’ आणि ‘अजामिनपात्र’ अशी विभागणी केली आहे.

जामीनपात्र गुन्ह्यात तपास अधिकारी किंवा पोलीस आरोपीला जामीन देऊ शकतात.
जर आरोपीने जामिनाच्या सर्व अटी पूर्ण केल्या असतील तर तपास अधिकारी त्याला जामीन देण्यास बांधील आहेत.

अजामीनपात्र गुन्ह्यात पोलीस जामीन देऊ शकत नाहीत.
अटक केल्यानंतर 24 तासांच्या आत आरोपीला दंडाधिकारी किंवा न्यायालयात हजर केले जाते आणि तेथून त्याला जामीन मिळू शकतो.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Nude Photo Shoot | ranveer singh nude photo shoot controversy mumbai fir ipc section 292 293 509 it act 67a

 

हे देखील वाचा :

Shivsena | शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील नेत्याने बोलून दाखवली मनातील खदखद, म्हणाले-‘एवढा मोठा त्याग करुनही पक्षाने…’

Pune Crime | चुहा गँगच्या म्होरक्यासह टोळी भारती विद्यापीठ पोलिसांच्या जाळ्यात

Pune PMC NEWS | कोरोनाच्या साथीमध्ये बँक बॅलन्स ‘मायनस’ झाला ! महापालिका शाळेतील 7 हजार विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी ‘डीबीटी’द्वारे पैसे मिळण्यात अडचण

 

Related Posts