IMPIMP

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार नाशिक कारागृहात स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 87 जणांवर कारवाई

by nagesh
Pune Crime | MPDA Action On Criminal of Hadapsar CP Amitabh Gupta

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime | लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंडणी मागून दहशत पसरवणारा अट्टल गुन्हेगार मोन्या
उर्फ रोनाल्ड अनिल निर्मळ याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची (Pune Crime) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस
आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आजपर्यंत 87 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार मोन्या उर्फ रोनाल्ड अनिल निर्मळ (वय – 24, रा. म्हातोबाची आळंदी रोड, कुंजीरवाडी, लोणी काळभोर) याने साथीदाराच्या मदतीने पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोयता, चाकू, तलवार यांसारख्या हत्यारांसह फिरताना खुनाचा प्रयत्न, खंडणी, दुखापत करणे, दंगा करणे, बेकायदा हत्यार बाळगणे असे गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षांत त्याच्यावर पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अशा कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यस्थेस बाधा निर्माण झाली होती. (Pune Crime)

 

आरोपीवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस
निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी वरिष्ठांच्या मार्फत पोलीस आयुक्तांना दिला होता.
प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करून पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी
रोनाल्ड निर्मळ याला एमपीडीए कायद्यान्वये नाशिक मध्यवर्ती कारागृहात एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्याचे
आदेश दिले आहेत. (Pune Crime) ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण,
पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | Pune’s criminals lodged in Nashik jail, CP Amitabh Gupta takes action against 87 under MPDA Act

 

हे देखील वाचा :

Pune ACB Trap | 2 लाखांची लाच मागून 30 हजार घेताना पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेतील दीपक क्षीरसागरसह दोघांना अटक, पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Pune News | साताराकडून पुण्याकडे येणारी वाहतूक नवीन कात्रजबोगद्यातून दरीपूलमार्गे

 

 

Related Posts