IMPIMP

Pune Crime | ‘तू खूप सुंदर दिसतेस, फिरायला येतेस का?’ असं म्हणणं सिक्युरिटी सुपरवायझरला पडलं महागात

by nagesh
Pune Crime | Rape on 25 year old girl FIR in Pune against Mangesh Mahaling Patne of Latur

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | सोसायटीच्या गेटवर सिक्युरिटी सुपरवायझर म्हणून काम करणार्‍या एकाने गेटवरुन जाणार्‍या महिलेचा पाठलाग करुन ‘तू खूप सुंदर दिसतेस़ मला खूप आवडतेस, माझ्या सोबत फिरायला येतेस का’ असे विचारुन महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार वडगाव शेरी (vadgaon sheri) परिसरात घडला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerwada Police) परिसरातील एका सोसायटीच्या सिक्युरिटी सुपरवायझरविरुद्ध विनयभंगाचा (molestation) गुन्हा
दाखल केला आहे. याप्रकरणी एका 36 वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या कामाला
जात असताना त्यांना सोसायटीच्या गेटवरुन पुढे जावे लागते. फिर्यादी या गेटवरुन कामावर जात असताना गेल्या 15 दिवसापासून सिक्युरिटी
सुपरवायझर त्यांना त्रास देत होता. त्यांचा पाठलाग करीत होता. 25 ऑगस्ट रोजी फिर्यादी या गेटवरुन कामाला जात असताना आरोपीने त्यांचा पाठलाग केला. फिर्यादी यांना ‘‘तू खूप सुंदर दिसतेस, मला खूप आवडतेस, माझ्यासोबत फिरायला येतेस का’’ असे बोलून फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.

या घटनेची माहिती मिळाल्यावर येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलीस उपनिरीक्षक डोंगरे अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Saying ‘You look so beautiful, can you go for a walk?’ Cost the security supervisor dearly

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘पप्पी दे’ असे म्हणत घरात घुसून अश्लील कृत्य करत 16 वर्षीय मुलीचा 26 वर्षीय युवकाकडून विनयभंग

5 Money Task | डायरीत नोंद करा 30 सप्टेंबरची तारीख, ‘या’ महिन्यात ‘ही’ सर्व कामे पूर्ण करण्याची आहे डेडलाइन; जाणून घ्या

‘e-SHRAM’ च्या वेबसाइटवर या लोकांनी आवश्य करावे रजिस्ट्रेशन, थेट खात्यात येऊ लागतील सरकारी पैसे; जाणून घ्या

 

Related Posts