IMPIMP

Pune Crime | ज्युस सेंटरच्या मालकावर खुनी हल्ला करणार्‍याला शिवाजीनगर पोलिसांकडून अटक

by nagesh
Pune Crime News | Innkeeper who stole from PMPML bus arrested, valuables seized

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | नोकरी मिळविण्यासाठी दुकानाबाहेर बसलेला असताना वाद घातल्याच्या कारणावरुन एकाने ज्युस सेंटरच्या मालकाच्या डोक्यात हातोड्याने घाव घालून खूनाचा प्रयत्न (Attempt To Kill) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी (Shivaji Nagar Police Station) बालाजी शंकर बनसोडे (वय ३६, रा. कर्वेनगर – Karve Nagar, मुळ रा. सोलापूर – Solapur) याला अटक केली आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शिवाजी पुलाखाली असलेल्या स्वामी समर्थ ज्युस सेंटरचे मालक हेमंत राजेंद्र कणसे (वय ३५) यांच्या डोक्यात हातोडाने वार करुन गंभीर जखमी करण्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक भोलेनाथ, अहिवळे व त्यांचे सहकारी करीत होते. कर्वेनगर येथील राजलक्ष्मी हॉटेलमध्ये वेटर असलेल्या बालाजी बनसोडे याने हा हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले. (Pune Crime)

 

बालाजी बनसोडे यांच्याविरुद्ध सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात खूनाचा प्रयत्न, खंडणी, जबरी चोरी, मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तो सोलापूर सोडून पुण्यात काम शोधायला आला होता. शिवाजीनगर येथील एका लॉजमध्ये राहत असताना तो स्वामी समर्थ ज्युस सेंटरजवळ असलेल्या एका दुकानाबाहेर दिवसभर बसत असे. त्यावरुन हेमंत कणसे याला बोलत असे. त्यातून त्यांच्यात वादावादी झाली होती. या रागातून त्याने हेमंत कणसे यांच्यावर हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे (Senior Police Inspector Anita More),
पोलीस निरीक्षक विक्रम गौड (Police Inspector Vikram Gaud)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे (API Bholenath Ahivale),
उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर (PSI Atul Kshirsagar),
अंमलदार अतुल साठे, प्रविण राजपूत, रणजित फडतरे, अविनाश भिवरे, भालचंद्र बोरकर, कांतीलाल गुंड, शरद राऊत व पालके यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Shivajinagar police arrest pune criminal who attack on juice center owner

 

हे देखील वाचा :

Indapur News | दुर्दैवी ! इंदापूर तालुक्यात एकाच दिवशी पती-पत्नीचे निधन

Healthy Liver | यकृत निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ 5 आरोग्यदायी पदार्थ आवश्यक

Pune Crime | रिक्षात विसरलेली बॅग आणून दिली पण सोन्याचे दागिने, रोकड केली लंपास; चंदननगरमधील घटनेत रिक्षाचालकावर गुन्हा दाखल

 

Related Posts