IMPIMP

Pune Crime | भिकारी आणि भंगारवाल्यामुळे खुनाचा उलगडा; पुणे पोलिसांकडून दोघांना अटक

by nagesh
Pune Crime | Former bjp corporator Dhananjay Jadhav beats msedcl official who came collect overdue electricity bill dattawadi police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन शिवाजीनगर परिसरात अज्ञात व्यक्तीच्या खुनाचा (Pune Crime) उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. भंगारवाल्यासह भिकाऱ्यांकडे पोलिसांनी (Pune Police) केलेल्या चौकशीत पोलिसांच्या हाती महत्त्वाचे सुगावे लागले. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यामातून पोलिसांनी तपास करत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या (two arrest) आहेत. ही खुनाची घटना (Pune Crime) शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या (Shivajinagar Police Station) हद्दीत खुडे ब्रिजखाली (khude bridge) घडली होती.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

महेश शिवाजी देव उर्फ तंबी (वय-30 रा. खुडे ब्रिजजवळ, शिवाजीनागर) आणि प्रकाश यादव (वय-33 रा. शनिवार पेठ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर मध्ये एका अज्ञात तरुणाचा खून झाला होता. त्यानुसार तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेजसह परिसरातील कचरावेचक आणि भंगारवाल्याने दिलेली माहिती एकत्रित केली.

तांत्रिक विश्लेषणाद्वारे रस्त्यावर कचरा वेचणारे, भंगाराचे दुकानदार, भिख मागणाऱ्यांसह 70 ते 75 लोकांकडे चौकशी केली.
याशिवाय पोलिसांनी हद्दीत फिरून तपास केला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली.
चौकशी दरम्यान आरोपींनी दारु पिण्याच्या वादातून खून (Pune Crime) केल्याची कबुली दिली आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे (DCP dr priyanka narnaware), वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे (Senior Police Inspector Anita More), पोलीस निरीक्षक विक्रम गौड (Police Inspector Vikram Goud) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षिरसागर (PSI Atul Kshirsagar), अर्जुन नाईकवाडी, अविनाश भिवरे, रणजित फडतरे, बशिर सय्याद, रुपेश वाघमारे, कांतीलाल गुंड, संतोष मेमाणे, शरद राऊत, अनिकेत भिंगारे, राहुल होळकर यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | shivajinagar police solve khude bridge murder case two arrested in pune

 

हे देखील वाचा :

Tax on Gold Investment | सोन्यात गुंतवणूक केल्यास कोण-कोणते टॅक्स द्यावे लागतात?, गुंतवणुकीचे प्रकार किती?; जाणून घ्या

Pune Coronavirus | पुणे जिल्ह्यात कोरोना काळात एक हजार 920 पोरं झाली पोरकी

Pune Crime | …म्हणून ‘कात्रजचा खून झाला’, खून का झाला याचा उलगडा करणारा व्हिडिओ ‘व्हायरल’

 

Related Posts