IMPIMP

Pune Crime | भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला पहिल्या मजल्यावरुन खाली फेकले, पुण्यातील घटना

by nagesh
Pune Crime | mk companys gang notorious criminal mangesh kadam surrendered the pune rural police haveli police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | कामाच्या पैशांवरुन मारहाण करणार्‍या सहकार्‍याला सोडविण्यासाठी आलेल्या तरुणाला दोघांनी पहिल्या मजल्यावरुन उचलून खाली फेकून दिले. त्यानंतर त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) दोघांना अटक केली (Pune Crime) आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

संजय मुरलीधर तुंवर (वय ४६) आणि रामचंद्र किसन वाघचौरे (वय ३६, रा. सुयोग निसर्ग सोसायटी, वाघोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना वडगाव खुर्द येथील व्योमकेश हाईटस येथे शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी मंतजिर हासिफ आलम (वय २१, रा. वडगाव खुर्द) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्योमकेश हाईटस येथील बांधकाम साईटवर फिर्यादी
यांचा सहकारी जुनेद याला आरोपी कामावरुन व पेमेंटवरुन मारहाण करीत होते. त्यावेळी फिर्यादी हे
भांडणे सोडविण्यासाठी गेले. फिर्यादी यांनी आरोपींना तुम्ही कामाबाबत आमचे ठेकेदार जावीर यांना सांगा, असे सांगितले. त्याचा आरोपींना राग आल्याने त्यांनी चिडुन फिर्यादी यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. जबरदस्तीने ओढत जिन्याने पहिल्या मजल्यावर नेऊन त्या ठिकाणी मारहाण करुन फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने खाली फेकून दिले. त्यात फिर्यादी हे गंभीर जखमी होऊन खाली पडले. असे असताना आरोपींनी पुन्हा खाली येऊन फिर्यादी यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. सिंहगड रोड पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक खेडकर तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | sinhagad road police arrest two

 

हे देखील वाचा :

Heart disease | नवीन शोधात खुलासा, ह्रदय रोगापासून बचाव करण्यासाठी रोज प्या 3 कप कॉफी!

Diabetes Diet | डायबिटीजच्या रूग्णांसाठी दिलासादायक ! ‘या’ डाएटने नियंत्रित होईल ब्लड शुगर, जाणून घ्या

Indian Railways, IRCTC | डुप्लीकेट तिकिटाची मागणी केव्हा करता येते? जाणून घ्या पद्धत

 

Related Posts